दान नाही... मदत

  • 15k
  • 4.9k

लाड कारंजावरुन येऊन जयवंतला एक आठवडा झाला होता. बाबांचा चेहरा डोळ्यापुढून जात नव्हता. कसे असतील? काय करत असतील? आई शिवाय त्यांचं जगणं ही कल्पना त्या क्षणी त्याला असह्य होत होती. आईच्या अचानक जाण्याने समस्त नाईक कुटुंब शोकाकुल होतं. आईच्या इच्छेप्रमाणे तिचे दिवस वार न करता ठराविक रक्कम लाडकारंजाच्या मठात देऊन तो नाशिकला परतला होता. बाबांना आग्रह करुनही कारंज्याहूनच ते अकोल्याला परतले.आई ..... आठवणीने जयवंतचे डोळे भरुन आले."जयवंत ... हे घे चहा." शर्वरीने त्याच्या हातात कप दिला आणि ती ही टेरेसवरुन खाली बगिच्यात खेळणार्‍या मुलांकडे बघू लागली."बाबांची काळजी वाटतेय न?" शर्वरी"हो गं, बाबा एकटे कसे रहातील, कसं सगळं मॅनेज करतील हाच