माझा सिंह गेला - भाग-२

  • 8.2k
  • 3.2k

भाग २ - वाघ(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.) भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता.