बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - १

(23)
  • 62.2k
  • 1
  • 47.8k

सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...धावतच होता... मोगली छावणी पासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते..स्वराज्यावर अस्मानी संकट धावून येत होते..कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता..धावता धावता पडत होता कि पडता पडता धावत होता...हात पायाला खरचटले होता...अंगावरचे कपडे पण ठीक ठिकाणी फाटले होते...अगदी कशाचेही त्याला भान नव्हते...काही करून लवकरात लवकर बहिर्जीना गाठायचे होते. सयाजी...खबरचं अशी घेऊन आलं होता...ते ऐकून बहिर्जी चिंतेत पडले होते पण विचलित झाले नव्हते कारण त्यांना