बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ३

(16)
  • 31.8k
  • 1
  • 22.2k

तिथे खलिता पोचता झाला...आणि तिथे दिलेरखान आणि मिर्झाराजे यांनी पुरंदरच्या पायथ्याशी तळ टाकला ...जिथे बघावे तिथे अफाट सैन्यसागर... प्रथम वज्रगडावर हल्ला सुरु झाला.. मिर्झाराजे जय‌सिंगाने शिवाजी महाराजांविरोधात कुशल रणनीती अवलंबली होती...आधी किल्ल्याचा आसपासचा सपाटीचा प्रदेश जिकून...किल्ल्यावर होणारी रसद तोडायची आणि आसपासच्या परिसरात जाळपोळ, लुटालूट आणि किल्ल्याकडे येणारे जाणारे सर्व मार्ग रोखून धरायचे... राजांना वाटले त्यापेक्षा मिर्झाराजांशी कडवी झुंज होत होती...दोघेही कसलेले सेनानी होते...पण मोगलांच्या तुलनेत स्वराज्याचा खजिना आणि मनुष्यबळ कमी पडलं होते..राजे आपल्या वकिलांमार्फत वाटाघाटी करायला ऊत्सुक होते पण मिर्झाराजांनी स्पष्ट शब्दात आदेश दिला होता...जो काही तह होईल तो त्यांच्या अटींवर होईल.. आणि