मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्त्र

  • 17.8k
  • 3.5k

भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा मानसोल्लास अर्थात अभिलषितार्थचिन्तामणि हा ग्रंथ. (शतक १२ वे). राजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुलातील राजा. त्याने इ.स. ११२७ मध्ये राज्यकारभार स्वीकारला. हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. सदर ग्रंथात राज्य मिळविण्यासाठीचे उपाय, मनोरंजनाच्या गोष्टी, सुख देणा-या क्रीडा, चित्रकला, आयुर्वेद, धार्मिक विधी, मनुष्याचे आदर्श वर्तन कसे असावे इ. विविध विषयांची माहिती या ग्रंथात मिळते.