एक पत्र... संकल्पास

  • 10.9k
  • 1
  • 3.2k

** एक पत्र...संकल्पास !**प्रती,अतिप्रिय संकल्प,स. न. वि. वि. अनेक महिन्यांपासून तुला पत्र लिहावे असा 'संकल्प' केला होता. परंतु संकल्पपूर्तीचा योग साधला जात नव्हता. नेहमीप्रमाणे 'आता लिहू, थोड्या वेळाने लिहू, आज....उद्या लिहू...' असे करताना संकल्पपूर्तीसाठी आजचा दिवस उजाडला. लिहायला तर सुरुवात केली आहे पण पूर्तता कधी होईल, पूर्णत्वास जाईल का?, जाईल किंवा नाही हे मी तरी सांगू शकत नाही. कारण आम्ही माणसं 'आरंभशूर!' कोणत्याही गोष्टीची सुरुवात नेहमीच धूमधडाक्यात करतो परंतु आमच्या आरंभशूरतेला 'आळस' हा वैरी कायम चिकटलेला असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी मोठमोठ्या योजनांची सुरुवातही आम्ही वाजतगाजत