बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ४

(17)
  • 32.1k
  • 15.4k

पुरंदर पडला ...अगदी नेटाने झुंजला...मुरारबाजी फक्त सातशे मावळ्यांनिशी आणि दिलेरखानाच्या ५००० मोघलांना भारी पडला..पुरंदर शेवटच्या घटका मोजत होता...आणि आता मरायचे तर मारूनच मरायचे...काही कळण्याचा आत गडाचा दरवाजा उघडला गेला कोणी कल्पनाच केली नव्हती तिथे राजे मिर्झाराजे जयसिंग बरोबर वाटाघाटी करत होते इतके दिवस झुंजणारा गड असा पडला...दिलेरखानाला वाटले गड आला ताब्यात..लढाई काही काळ थांबली...मोघली फोज...नाचायला लागली...आनंद झाला सर्वाना...किल्लेदार मुरारबाजी आणि मावळे खाली धावत येताना दिसले.. येवढी कसली घाई होती त्यांना?? हत्यार टाकायची?? शत्रुसमोर मान झुकवायची??...मोघली वेढा क्षणाक्षणाला जवळ येत होता....पण हे काय दौड कमी करायची सोडून...अजून जोमाने दौडत होते..मोघली सैन्य आता काही हांतांवर होते..आणि अचानक मुरारबाजी