जयंता - 2

(13)
  • 12.2k
  • 8.1k

“बये, नको जाऊ कामाला. तू घरीच राहा आज. राहतेस का?” लहान बाबू म्हणाला. “जायला हवं मला. कांडण आहे. न जाऊन कसे चालेल? मी दुपारची येऊन जाईन हा. तू पडून राहा. दादाक़डून येताना भात, लोणचे घेऊन येईन. पडून राहा. बाहेर जाऊ नकोस” लक्ष्मी बाबूच्या डोक्यावरुन हात फिरवीत म्हणाली. “बाबा कुठे गेले ?” “कुठे गेले देवाला माहीत. आले घरी तर बसतील तुझ्याजवळ. कामाला जायला ते आजारी असतात. गप्पा मारायला, चिलमी ओढायला नसते आजारपण. काय करायचे ? तू पडून राहा हं,” ती त्याच्या अंगावर पांघरुण घालून म्हणाली.