जयंता - कादंबरी
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
“जयंता, तू पास होशीलच पुढे काय करणार तू ? तुझा मोठा भाऊ तर चळवळीत गेला. तुझ्या मनात काय आहे ? वडिलांनी विचारले.”
“चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाही. मी लहान मुलगा. कोठे जाणार ? परंतु मला खूप ...अजून वाचाइच्छा आहे.”
“कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ?
“बाबा, मला नादारी मिळेल. मला मार्क्स चांगले मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीही कदाचित मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाही.”
“जयंता, तू पास होशीलच पुढे काय करणार तू ? तुझा मोठा भाऊ तर चळवळीत गेला. तुझ्या मनात काय आहे ? वडिलांनी विचारले.”
“चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाही. मी लहान मुलगा. कोठे जाणार ? परंतु मला खूप ...अजून वाचाइच्छा आहे.”
“कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ?
“बाबा, मला नादारी मिळेल. मला मार्क्स चांगले मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीही कदाचित मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाही.”
“बये, नको जाऊ कामाला. तू घरीच राहा आज. राहतेस का?” लहान बाबू म्हणाला.
“जायला हवं मला. कांडण आहे. न जाऊन कसे चालेल? मी दुपारची येऊन जाईन हा. तू पडून राहा. दादाक़डून येताना भात, लोणचे घेऊन येईन. पडून राहा. बाहेर जाऊ ...अजून वाचालक्ष्मी बाबूच्या डोक्यावरुन हात फिरवीत म्हणाली.
“बाबा कुठे गेले ?”
“कुठे गेले देवाला माहीत. आले घरी तर बसतील तुझ्याजवळ. कामाला जायला ते आजारी असतात. गप्पा मारायला, चिलमी ओढायला नसते आजारपण. काय करायचे ? तू पडून राहा हं,” ती त्याच्या अंगावर पांघरुण घालून म्हणाली.
सायंकाळी वेळ होती. महालक्ष्मी स्टेशनात मी होतो. गाड्या भरुन येत होत्या. जागा मिळेना घुसायला, दार धरुन उभे राहायला मला धैर्य होत नव्हते. जेव्हा मोकळी जागा मिळेल तेव्हाच गाडीत बसेन असे ठरवून मी एका बाकावर बसलो होतो. इतक्यात पंधरा-सोळा वर्षांचा ...अजून वाचातरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याच्या अंगावर चिंध्या होत्या. त्याची ती उंच देहयष्टी कृश दिसत होती. त्याच्या डोळ्यांत करुणा होती. त्याचे ते ओठ थरथरत होते. मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो माझ्याक़डे बघत होता. तो माझ्या डोळ्यांत सहानुभूती शोधीत होता. मी त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकता शोधीत होतो.
काही वर्षांपूर्वीचा तो अनुभव. चार-पाच वर्षे त्या गोष्टीला झाली. मी बोर्डीला गेलो होतो. तेथील सुंदर समुद्रशोभा रोज बघत होतो.
“तुम्हा जवळची आदिवासींची गावे बघायला याल ? चला, नाही म्हणू नका.” एक मित्र म्हणाले.
“जाऊ” मी म्हटले.
आणि आम्ही दोघे गेलो. पावसाळा नुकताच ...अजून वाचाहोता. आजूबाजूला हिरवीपिवळी शेते. मधूनमधून नाले होते. बांधाबांधाने जात होतो. एका बाजूला गवताळ भाग दिसला.
मी तेव्हा मुंबईस होतो. आणि ते उन्हाळ्याचे दिवस. रात्रभर मला झोप आली नव्हती. जेथे राहत होतो तेथे ना वारा ना काही. मुंबईत राहणे महाकर्म कठीण असे वाटले. मला नेहमी उघड्यावर राहावयाची सवय. परंतु मुंबईत मी उघड्यावर कोठे झोपणार ? ...अजून वाचामी जथे होतो. तेथे झोपायला जागा तरी होती. माझ्यासमोर ती लाखो माणसे आली, जी एकेका खोलीत डझनावेरी राहतात. त्यांची काय दशा असेल ? फुटपाथवर ती झोपतात. परंतु पावसाळ्यात काय करीत असतील ? कधी त्यांना राहायला नीट चाळी मिळतील ? रात्रभर या विचारातच मी होतो. पहाटे जरा डोळा लागला.