दिवाळी आपल्या लहानपणीची

  • 12.2k
  • 2.6k

थंडीची चाहूल लागलेली असायची.. आणि मोती साबणाची दूरदर्शन वर जाहिरात दाखवायला सुरुवात... सहामाही परीक्षा संपायला १ ते २ पेपर शिल्लक असायचे...पण तो पर्यँत दिवाळी ची चाहूल लागलेली असायची..शाळेतुन बाजारातुन येताजाता...फटाके,कपडे,पिस्तूल,आकाश कंदील ...दिवाळीच्या आधी वाजणारे एक दोन चुकार फटाके...अक्षरशः माहौल बनायचा... खूप काही दिसायचे.. तेव्हा कधी एकदा हे पेपर संपातायत असे होऊन जायचे.. आणि शेवटचा पेपर लिहून शिक्षकां जवळ दिला कि आमची दिवाळी तिथे वर्गातच चालू... शेवटचा पेपर आणि पहिली आंघोळ यात साधारणपणे ५ ते ७ दिवसांचा कालावधी असायचा...त्याच पाच दिवसांत आम्ही बच्चे कंपनीचा " दिवाळीचा अभ्यास " संपवायचा हेच एक उद्दिष्ट असायचे आणि आपली वही सर्वांच्या वहीपेक्षा कशी सुंदर दिसेल