सूड ... (भाग १)

(20)
  • 47.6k
  • 3
  • 28.7k

"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. "काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. " बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक