मी एक अर्धवटराव - 20

  • 6.8k
  • 2.1k

२०) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी आम्ही दोघे टीव्हीवरील एक मालिका बघत होतो. खरे तर आजकालच्या मालिका मी बघत नाही पण सौभाग्यवती एकूणएक मालिका पाहात असल्यामुळे मलाही पकडून आणल्याप्रमाणे सायंकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत टीव्हीसमोर बसावेच लागते. टीव्हीचा आणि माझा संबध फक्त क्रिकेटचे सामने, बातम्या आणि काही आवडीचे सिनेमा लागले तर पाहणे इतकाच! क्रिकेटचे मला एवढे प्रचंड वेड आहे की, जेव्हा कुठलाही सामना सुरू नसतो, कोणत्याही सामन्याचे थेट प्रक्षेपण नसते तेव्हा कुठल्या ना कुठल्या खेळाच्या वाहिनीवर मागच्या कुठल्या तरी सामन्यांची क्षणचित्रे दाखवत असतात तीच मी तासनतास पाहात बसतो. मला कंटाळा येत नाही. तितक्यात मालिकेत 'क्षणभराची'