प्रलय - २९

  • 8.4k
  • 2
  • 3.1k

क्यमःश-२९ विश्वनाथ भैरव आणि पार्थव काळ्या भिंतीपाशी आले . " तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर..." भैरव म्हणाला " चिंता नको काही क्षणात ही भिंत कोसळलेली असेल ...." विश्वनाथ म्हणाला . नंतर त्यांनी आणलेल्या गोष्टी मांडायला सुरुवात केली . विचित्र भाषेत कसलेतरी मंत्र तो उच्चारत होता . मधुमोध पेटवलेल्या अग्निकुंडात एकापाठोपाठ एक आहुती देत होता . त्यातूनही चित्रविचित्र आवाज निघत होते . पण भिंत अजून हलली सुद्धा नव्हती . " काही होत नाही वाटतं . किती वेळ झाला ....." भैरव म्हणाला . " विक्रमासाठी तुम्ही इतकी वर्षे वाट बघितली , अजून काही क्षण वाट पाहू शकत नाही का