पहाट झाली होती.जरासं तांबडं फुटल्यासारखं वाटत होत,त्या तसल्या अंधुक प्रकाशात वाट काढत काढत शेवटी विजू गावच्या वेशी जवळ पोहोचलाच,.चेहऱ्यावरून गावात कस तरी करून पोहोचल्याचा आंनद ओसंडून वाहत होता,त्याला कारण सुद्धा तसंच होत.गावातून बाहेर पडायला आणि गावात घुसायला दोनच रस्ते.त्यातला एक रस्ता ऐन पावसात नदीच्या पुरामुळे पुरता बंद व्हायचा.आणि दुसरा रस्ता जायचा तो घनदाट झाडीतून,जन्गलातून,आणि त्या तसल्या वाटेतून कसातरी रस्ता काढत काढत दोन वर्षा नंतर तो गावात पोहोचला होता.गावात तर आला पण आता कधी घरी पोहोचतो आणि कधी नाही असं त्याला झालं होतं.गावात कालच भरपूर पाऊस पडल्याने जागोजागी चिखल जमला होता,कशीतरी त्यातनं वाट काढत काढत तो पुढे सर करू लागला.आता पहाट