खिडकी - २

  • 7.7k
  • 2.7k

नंदाने हातातले फुलपात्र जमिनीवर आपटल्याने कर्ण-कर्कश आवाज झाला आणि मी दचकुन किंचाळलो, मा‍झ्या किंचाळण्यामुळे आई आणि नंदा आपसूकच घाबरल्या आणि दोन पावले मागे सरकल्या. काय झाले हे मला समजल्यावर मात्र मी भानावर आलो आणि दोघींनाही शांत केले. “असेच टक लावून बसतात बाहेर. काय दिसतयं रे एवढे त्या खिडकीतून?” – आई “आग तेच तर बघण्यासाठी मी इथे बसलो होतो, आणि त्याच विचारात हरवून गेलो होतो. पण इथुन तर फक्त समोरची बाग दिसते, जिथे काही मुले खेळत असतात, काही जण बाकड्यावर बसले असतात आणि मग पलीकडचा रस्ता दिसतो. विशेष असे काहीच नाही.” – मी मा‍झ्या बोलण्यावर बहुतेक त्यांचा विश्वास नसावा, त्यामुळे दोघींनीदेखील