बोरमाळ

  • 10.1k
  • 3k

'बोरमाळ' कुणाच्या घरी गणपतीच्या वेळी पुजा ठेवतात तर कुणाच्या घरी वास्तुशांतीला पुजा ठेवतात.कुणी लग्नाची पुजा ठेवतात,तर कुणी मंदिरात मुर्ती स्थापन करताना पुजा ठेवतात. गावात एकही ब्राम्हण किंवा पंडित नसल्यामुळे गावातील रामोशी जातीचे खाशाबानाना,सगळे त्यांना 'शाहीरनाना' म्हणतात.लग्न लावणं,सत्यनारायणाची कथा वाचने यासारखी धार्मिक कामं तेच करतात. आता त्यांना धाप लागत असल्याने दोन एक किलोमीटर अंतर चालून जाणे शक्य नाही.आता ते घरापासून आवाक्याच्या आतल्या पल्ल्यापर्यंत जातात.कुणाचं लग्न लावायचं असेल तर लग्न मालक त्यांना घेऊन जाण्याची आणि आणून सोडायची जबाबदारी घेत असतील तरच जातात. एकदा आमच्या मंडळ्याच्या गणपतीच्या वेळी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती.पुजेसाठी सत्यनारायनाची पुजा वाचण्यासाठी त्यांना बोलावलं होतं. कथा वाचताना मधेमधे त्यांना