पहिला नंबर

  • 9.6k
  • 3.6k

उद्धव भयवाळ औरंगाबाद पहिला नंबर { विनोदी कथा } नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो. चहाच्या कपाऐवजी सौ.ने वर्तमानपत्र हातात देत ती धक्कादायक बातमी सांगितली. मीसुद्धा माझ्या डोळ्यांनी ती बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि चक्रावूनच गेलो. मनातल्या मनात वाडेकरांवर दात ओठ खाऊ लागलो. धक्का देणारी ती बातमी अशी होती. "भाग्यश्री सेव्हिंग स्कीमच्या पहिल्या सोडतीतील बक्षिस – एक टायटन रिस्टवॉच श्री वाडेकर यांना मिळाले." अशा प्रकारच्या सेव्हिंग स्कीम्समध्ये पहिले बक्षिस पटकावण्याची वाडेकरांची ही पाचवी वेळ होती. आता मात्र मी खूपच अस्वस्थ झालो होतो. वाडेकर माझ्या परिचयाचे गृहस्थ होते. माझ्याप्रमाणेच तेही कुठल्याशा सरकारी नोकरीत होते. एकदा काय झाले, आमच्या गावातील एका रेडिओ विक्रेत्याने