वारस - भाग 6

(16)
  • 14.2k
  • 8k

6सरांनी हि पूर्ण कहाणी सांगितली अन एक सुस्कारा टाकला.त्यांनी हळुवार प्रत्येकाकडे बघितल.महेश,सूर्या, तुका ,कविता यांच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.आपल्या गावात अस काही झालं असेल याची कल्पनाहि त्यांनी कधी केली नसणार,,श्रीधर ला अनेक प्रश्न पडले अस वाटत होत,,तर विजू,विजूच्या चेहऱ्यावरची लकेर सुद्धा बदलली नव्हती,इकडे श्रीधर ने त्यात प्रश्न टाकला, सर पण जर का तो वाड्यात कैद आहे,मग त्याने वाड्याच्या बाहेर येऊन हत्या कशा केल्या? हा चांगला प्रश्न विचारलास बेटा.काय आहे ना कुठलंही मायाजाल असलं ना तरी त्याची एक कमजोर कडी असतेच...तो त्या वाड्यात कैद आहे असं म्हणण्यापेक्षा तो तिथून बाहेर पडू शकत नाही. बाहेरचा प्रकाश मग तो कुठलाही असो त्याला अडवून ठेवतो,पावसाळ्यात