उद्धव भयवाळ औरंगाबाद एका चोरीची गोष्ट सहज म्हणून खेडकरांच्या घरी मी गेलो आणि ते घरी भेटले असे सहसा कधी होत नसे. ते कुठेतरी बाहेर गेलेले असत. विशेषत: रविवारी तर स्वारी दिवसभर बाहेरच असायची. म्हणून आज रविवार असल्यामुळे खेडकर घरातून बाहेर पडले तर दिवसभर भेटणार नाहीत, या विचाराने मी जरा लवकरच त्यांच्याकडे गेलो. दार उघडेच होते. दारातूनच मी आवाज दिला, "आहेत का खेडकर?"या माझ्या प्रश्नानंतर नेहमीप्रमाणे वहिनी स्वयंपाकघरातून समोरच्या कमऱ्यात येऊन 'ते आत्ताच बाहेर गेलेत' असे उत्तर देतील अशी माझी अपेक्षा होती. पण काही क्षण वाट पाहूनही कुणीच समोर आले नाही तेव्हा मी पुन्हा एकवार हाक मारली. घरामध्ये कुणीच नाही याबद्दल माझी खात्री