अपूर्ण बदला ( भाग ५ )

  • 12.2k
  • 5.8k

रव्याला काही ठीक वाटत नव्हते, बाकी सगळ्यांनी आंबे खाल्यानंतर घरची वाट पकडली, हरी रव्यासोबत तिथेच थांबला तसही त्याला कुठे लांब जायचं होतं .रव्या तू आंबे का नाही खाल्ले रे? हरीने रव्याला त्याच्या मनामध्ये आलेला प्रश्न विचारला .पण रव्याचा काहीच उत्तर आले नाही. तो स्वतःच्या विचारात मग्न झालेला. त्याला सारखे तेच विचार मनामध्ये फिरत होते. त्या विचारात त्याला कुणीतरी आपल्याला स्पर्श करतय अस जाणवल आणि तो एकदम अचंबित होऊन ओरडणार तेवढ्यात हरीने विचारलं काय झालं? तु एवढा का घामाघुंम झाला आहेस . आईला न सांगता गेलो त्यांबद्दल घाबरलायस का? त्यामुळे हरी त्याला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला . अरे मी