अपूर्ण बदला ( भाग ६ )

  • 9.6k
  • 4.5k

काळ्या अंधाऱ्या रात्री कोणीतरी भयाण वाटेने धापा टाकत पळत होतं . आपल्या मागे कोणी लागलय आणि त्याच्यापासून बचावासाठी जीव मुठीत घेऊन दिसेल त्या वाटेने धावत पळत होता. काटेरी झाडाझुडपातून दिसेल त्या वाटेने. शरीरातून रक्तस्त्राव सुरु झालेला,डोळे रक्तासारखे लाल माखलेले ,श्वास फुलत होता, पाऊलवाटेवर सांडलेले रक्ताच्या वासावर ती शक्ती आजून चकलात होती. कोण होती माहित नाही? तो पळू लागला, पळता पळता मागे बघू लागला, किंचित त्याला कोणती तरी सावली दिसली, मागे एका जागेवरून दुसर्या जागेवर अशी उघडझाप दिसत होती. चंद्राच्या लक्ख प्रकाशामध्ये तो एकटाच कुठल्यातरी भयाण वाटेवरून पळत होता.कुठेतरी दूर पण थोडं जवळपास कसलातरी उजेड दिसला. आणि त्याला कुठेतरी जगण्याची उमेद