वैरण भाग-II

  • 12.3k
  • 3.7k

वैरण भाग-II  बादलीतून पाणी घेऊन तो म्हशींच्या जवळ आला.त्यांना पाणी पाजले.पुन्हा डोक्याला हात लावून विचार करत बसला.विचाराचा एकच प्रश्न 'वैरण'.काही सुचत नव्हते.डोक्यात विचारांचं काहूर माजले होते.डोकं फुटायची वेळ आली.तानाजीने एक मोठा श्र्वास घेऊन सुस्कारा सोडला आणि उठून घरी गेला.घरात येऊन कॉटवर आराम करण्यासाठी पडला.पण विचार चालूच होते.विचार करता करता संध्याकाळचे सहा कधी वाजले समजलेच नाही.जसजसा वेळ जात होता तसतसा तो अजून बेचैन होत होता.त्याला बिना वैरणीची दावण,भूकेलेल्या म्हशी, त्यांची वैरणीसाठीची तरफड डोळ्यासमोर दिसत होती.तानाजीचं मन तळमळत होतं.त्याला ना भूक लागत होती ना झोप.वेळ जात होता, सहा,सात,आठ..., रात्रीचे दोन वाजले.त्याने आदल्या दिवशी रात्री जेवण केले होते, त्यानंतर तो जेवला नव्हता.वैरणीच्या