नश्वर - भाग 1

(20)
  • 28.2k
  • 2
  • 8k

ती अमावस्येच्या रात्र होती,संपूर्ण प्रदेश शांत होता..मागे दिमाखात उभा असलेला सह्याद्री आज खूपच गंभीर वाटत होता. त्याच्याच पायथ्याशी वसलेली मलुकनगरी पूर्णतः निद्रा अवस्थेत होती,कधीकाळी संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल हे शहर आता मात्र तेव्हढं संपन्न राहिलेलं नव्हतं.या शहराची विशेष ओळख असलेलं एक मंदिर मात्र दिमाखात उभं होत.हो पण मंदिर मात्र कशाचं हे मात्र देव जाणे कारण त्याच्या निर्माणापासूनच मंदिराचा गाभारा कधी उघडलाच नव्हता. एव्हढ्या रात्री चांदणं नसताना सुद्धा 'तो' नदी पार करून मंदिराकडेच निघाला ,,मंदिराची पायरी लागताच त्याच्या चेहऱ्यावर असुरी हावभाव प्रकट झाले होते.हळूहळू तो एकेक पायरी चढत होता,13 पायऱ्या चढल्यानंतर आता मंदिराचा प्रवेशद्वार लागलं,प्रवेशद्वार म्हणाल ना तर कलेचा तो एक