The Infinite Loop of Love - 8

  • 6k
  • 1
  • 3.4k

जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांचे हात-पाय खुर्चीला बांधले होते . तोंडावरती पट्टी होती . चौघेही अंजलीच्या घरी कैद झाले होते . त्यांचे नियोजन पुन्हा एकदा फसले होते . त्यांच्यासमोर तो विक्षिप्त माणुस उभा होता . त्याला पाहून प्रीती बोलायचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडावरती पट्टी असल्याने तिला नीट बोलता येईना . " थांब थांब आत्ताच काढतो तुझ्या तोंडावरची पट्टी . आणि त्यांने प्रीतीच्या तोंडावरची पट्टी काढली.... " का मला मारायच्या मागे लागलायास तू ..... अजून किती वेळा मारणार आहेस .....? कोण आहेस तरी कोण तू .....? आणि मी काय वाईट केलय तुझं....? " "