मला काही सांगाचंय...- १६-२

  • 7.3k
  • 3.9k

इकडे रुग्णवाहिका कुमारला घेऊन पोहोचली .... वॉर्डबॉय त्याला चाकांच्या बेडवर ठेवून आत न्यायला लागले सोबत त्याचे वडील आणि सुजीतचे वडील मागे मागे जात होते ... दवाखाना अगदी स्वच्छ आणि सर्व सोयीसुविधायुक्त असल्याचे त्यांना दिसून आले .... त्याचे रिपोर्ट डॉक्टर वैद्य यांनी आधीच पाहिले होते म्हणून त्याला ICU मध्ये दाखल करण्याचे सांगितले होते .... त्याला ICU मध्ये दाखल केले तोच डॉक्टर , नर्स यांनी त्याला तपासून त्याची अवस्था समजून घेत त्याला आवश्यक ते इंजेक्शन , सलाईन लावून ते बाहेर आले . कुमारच्या वडिलांची भेट घेऊन त्याला निरीक्षण करण्यासाठी आज रात्रभर ठेवू आणि उद्या सकाळीच ऑपरेशन करू काळजीच कारण नाही ... सर्व