तोच चंद्रमा.. - 1

  • 10.7k
  • 4.9k

तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा.." "परत बघू माला.. हे माला .. तिते राह्यचा तू बाबा..?" "हो. आणि त्या रस्ताच्या बाजूला बिल्डिंग आहे ना ती माझी शाळा.." "मंजे, तू शाळेत पण जायचा.. मंजे तुला शंबरपर्यंत आकडे पण येतात बाबा?" "हो गं मोनुली.. सोनुली रे काय बाबा..?" "काय झाले.. अगं ते घर माझे.." "तू टेलिस्कोप हलवलायस बाबा.. हा चांदोबा आहे.. आणि तितले एक घर दिसते माला.." "हो गं छकुली.. " "मंजे तू तिते पण राह्यचा.." "हो गं मोनुली.. चांदोबा वरचे घर आहे