अपूर्ण बदला ( भाग १६)

  • 9.4k
  • 4.1k

गाडीच्या बाहेर पाऊल टाकताच एक छोटीशी गार वाऱ्याची झुळूक त्या महिलेच्या मानेवरून गेली. तिला मनात धस्स झाले ती गांगरून इकडे तिकडे पाहू लागली. नकळत तिच्या डोळ्यातू असावे गळू लागली. तिचा त्रास त्यालाही समजत होता पण त्याचीही तीच अवस्था होती. मनावर दगड ठेऊन सगळं विसरण्याचा त्याचा अनिश्क्रिय प्रयत्न तो करत होता. त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये जखडून चालू लागला. आणि सुरेशच्या घराच्या दिशेनं म्हणजेच हरीच्या घरी येऊन ते दांपत्य उभे राहिले. रव्याच्या आईबाबांना अचानक आणि एवढ्या तातडीने आलेले पाहून हरीच्या बाबांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. पण त्यांचंही दुःख होतच म्हणून वेळेचे अनुमान ठेऊन ते त्याच्याकडे पाहत होते. आणि आल्याबद्द्ल कडकडून आलिंगन दिले.