काल बर्याच वर्षांनी सर्कस पाहायचा योग आला. झाले असे की, गेल्या आठवड्यात माझा लाडका भाचा ईशांत.. शाळेतून एक डिस्काऊंट कुपन घेऊन आलेला. शहरात 'अमर सर्कस' नावाची सर्कस आली होती अन् त्याचे पन्नास टक्के डिस्काऊंट कुपन शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यात आले होते. सात वर्षांचा माझा भाचा सर्कस पाहण्यासाठी खुप उत्सुक होता. सर्कस पाहण्याच्या उत्साहापेक्षा त्याने काहीतरी फायद्याची गोष्ट आणली आहे, हा भाव त्याच्या चेहर्यावर होता. मोठी माणसं नाही का, भाजी वगैरे घेताना दोन पाच रूपये घासूनघासून कमी केले की घरी येऊन रूबाबात सांगतात. अगदी तसेच काहीतरी ईशांतच्या चेहर्यावर होतं. असो, रविवारचे मी त्याला सर्कस दाखवायचे कबूल केले. तसेही संक्रांत असल्याने घरी हळदीकुंकुचा