॥ चला धोंडे खाऊया! ॥ 'नमस्कार! मी चंद्रकांत, चंदू, चंद्रू,चँडी, चंद्या, चंद्र्या इत्यादी अनेक नावांनी गौरवान्वित झालेला. नावात काय असते? असे कुणी तरी म्हटले असले तरीही नावाच्या अपभ्रशांत बरेच काही दडलेले असते. अनेकदा आत्यंतिक लाडाने अपभ्रंश होत असला तरी काही वेळा मिळालेली नावे वैतागून, चिडून, रागाने दिलेली असतात. असो. हे झाले माझ्या पाळण्यातल्या, टोपणनावांचे! आता मी तुम्हाला माझ्या एका अत्यंत लाडक्या, आवडत्या, जीव की प्राण असलेल्या एका व्यक्तीच्या नावाचा इतिहास सांगणार आहे. अहो, असे बघताय का? आता