रोज डे ..आमच्या कॉलेजमयीन जीवनातला सर्वात सुंदर दिवस ...प्रत्येकाला त्या दिवसाची आवर्जून वाट असायची ..तसा तो आमच्या जीवनातही खास होता ...निशा कॉलेजमध्ये सर्वात फेमस त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर असायच्या तर मी तिची शेपटी ..कुठेही असलो की दोघे सोबत दिसायचोच ..त्यामुळे कपल नसताना देखील लोक आम्हाला कपल म्हणत होते ..रोज डे असल्यामुळे मी तिचा पिऊन म्हणून काम सांभाळत होतो ..तिला येणारा प्रत्येक मुलगा गुलाब देऊन जायचा आणि तीही तो प्रत्येक गुलाब माझ्याकडे सोपवायची ..गुलाब देणारे आणि गुलाब यांची संख्या इतकी वाढली की हातात गुलाब मावेना ..त्या दिवसाचा रंग तिच्या चेहऱ्यावर पुरेपूर खुलला होता आणि मी अगदी जवळून ते पाहू लागलो