“तुला माहीती आहे शशांक, नानासाहेबांपेक्षा भैय्यासाहेब मला जास्त जवळचे होते. लहानपणापासुन मी त्यांच्याच जवळ जास्ती असायचे. ‘डॉल’ होते मी त्यांची. लहानपणी मला ते ’ये डॉले..’ म्हणुन हाक मारायचे ना.. पण आता सारंच संपल! त्यांच्या ह्या अश्या जाण्याने मला खरंच खुप धक्का बसला आहे..” सुमन डोळे टिपत बोलत होती. “मला का कळत नाही का तुझं दुःख सुमी! पण इथं अजुन किती दिवस थांबणार आपणं? परत आपल्याला जायलाच हवं ना?” शशांक सुमनची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होता. “हो शशांक, पण मला असं वाटत होतं की भैय्यासाहेबांचा खुनी पकडला जाईपर्यंत तरी आपणं इथं थांबावं! मला त्या नराधमाचा चेहरा पहायचा आहे आणि विचारायचं आहे,