तोच चंद्रमा.. - 6

  • 6k
  • 2.1k

६ पुन्हा राॅबिन घरी आलो तर आई वाट पाहात होती. उगाच. अाई लोकांची ही सवयच असावी. पोर बाहेर पडले.. करा काळजी. लहानपणापासूनच पाहिलेय मी. आईच्या गळ्यातला ताईत मी. मला हवे ते आई देत असेच. लाडावले होते तिने मला कदाचित पण मीच बिघडणाऱ्यांतला नव्हतो. म्हणून मी बिघडलो नसावा! आई आम्हाला सोडून इथे वर्षभर आधी कशी अाली असेल? मला आश्चर्य वाटायचे. पण बहुधा बाबांची इकडे एकटेपणाची निकड कळली असावी तिला. त्यामुळे चक्क चंद्रावर चालण्याची कसरतही शिकायला तयार झाली असणार ती. आम्ही आलो तर म्हणाली, खूप वेळ झाला रे.. हुं. बागेत बसलो होतो. गप्पा मारत. ती कृत्रिम बाग आहे ना तिकडे. छान