मला काही सांगाचंय...- २०-१

  • 7.7k
  • 3.2k

२०. दिलासा मनात विचारांचं वादळ उठलेलं , तरी ती कामं करत होती ... तिने कपडे धुवून वाळायला दोरीवर टाकले , भांडे स्वच्छ धुवून किचनमध्ये ठेवले ... सतत मनात येणारे विचार शरीराला आणखी क्षीण करत होते त्यामुळे रोजच्यापेक्षा काम करायला तिला जास्त वेळ लागला . काम संपवून तिने घामाने चिंब झालेला चेहरा थंडगार पाण्याने धुऊन पदराने पुसला ... जरावेळ आराम करावा मग पुन्हा डायरी वाचत बसावं अस मनाशी ठरवून , पंखा सुरु केला आणि ती खुर्चीत बसली ... घामाने चिंब झाल्याने तो गार वारा तिला हवाहवासा वाटत होता ... तिने केसांची लांब वेणी समोर घेतली ... चेहऱ्यावर येणारे केस बाजूला सारले