Mala Kahi Sangachany - 20-1 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय...- २०-१

२०. दिलासा

मनात विचारांचं वादळ उठलेलं , तरी ती कामं करत होती ... तिने कपडे धुवून वाळायला दोरीवर टाकले , भांडे स्वच्छ धुवून किचनमध्ये ठेवले ... सतत मनात येणारे विचार शरीराला आणखी क्षीण करत होते त्यामुळे रोजच्यापेक्षा काम करायला तिला जास्त वेळ लागला . काम संपवून तिने घामाने चिंब झालेला चेहरा थंडगार पाण्याने धुऊन पदराने पुसला ... जरावेळ आराम करावा मग पुन्हा डायरी वाचत बसावं अस मनाशी ठरवून , पंखा सुरु केला आणि ती खुर्चीत बसली ... घामाने चिंब झाल्याने तो गार वारा तिला हवाहवासा वाटत होता ... तिने केसांची लांब वेणी समोर घेतली ... चेहऱ्यावर येणारे केस बाजूला सारले अन मान वर केली ... गार वाऱ्याने ती सुखावली . पंख्याचे फिरणारे पाते ती पाहत होती .. मनात विचाराचे चक्र सुरूच होते .. हळूहळू डोळे जड व्हायला लागले आणि तिने डोळे मिटले ...


बंद डोळ्यासमोर काही चित्र तिला दिसायला लागली ... जरा पुसट , काहीशी धूसर ... धुकं असलेली पहाट जणू ... मग तिला स्पष्ट दिसू लागलं ... नजरेसमोरचा देखावा तिला दिसत होता .. बेडवर जखमी अवस्थेत कुमार झोपलेला ... ती त्याच्या जवळ जाऊन त्याला पाहत आहे असं तिला भासत होतं ... तो क्षण आला जेव्हा ती त्याच्या समोर उभी आहे असं तिला वाटलं ... त्याचा चेहरा जसा तिने दवाखान्यात पाहिला होता तसाच याक्षणी तिच्या नजरेस आला ... ती पुन्हा कुमार आणि त्याने लिहिलेलं आठवून डायरीत पुढं आणखी काय लिहिलं असेल ?? असा प्रश्न तिला पडला , पुढं जे काय त्याने लिहिलं ते वाचावं या आतुरतेने तिने मिटलेले डोळे उघडले ....


ती खुर्चीतून उठली , तिने बेडरूम मध्ये जाऊन डायरी आणली ... ती परत येऊन पंख्याखाली खुर्चीवर बसली ... तिने खूण म्हणून ठेवलेलं विसीटिंग कार्ड पाहिलं ... डायरी जिथं ती वाचतांनी थांबली होती तेथून पुढे ती वाचायला लागली ...... .... .. .


कुमारने डायरीत पुढं लिहिलं होतं -----

ती दहावी उत्तीर्ण झाली तेव्हा मला वाटायचं कि तिने माझ्या कॉलेजला प्रवेश घ्यायला पाहिजे ... मी तिला दोन एक दिवसानंतर भेटत होतो ... तिच्याशी बोलत होतो .. एकदा बोलता बोलता तिने मला विचारलं की , ' उद्याला तू माझ्यासोबत येऊ शकशील का ?? मला माझी मार्कशीट आणि टी . सी . आणायची आहे ' मी तिला हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सोबतच शाळेला जाऊन मार्कशीट आणि टी . सी . घेऊन आलो ... त्यादिवशी दोघे बराच वेळ बोलत होतो पण तिला ' तू कोणत्या कॉलेजला प्रवेश घेणार आहे ? ' असं विचारणं मला जमलं नाही ... निदान तिने तरी मला विचारावं कि ' कोणत्या कॉलेजला प्रवेश करू ? ' असंही वाटायचं पण ना मी तिला विचारलं आणि तिने सुध्दा मला नाही विचारलं ....


कॉलेजला अकरावी करीता प्रवेश घ्यायला सुरुवात झाली होती ... माझे बारावीचे वर्ग सुरु व्हायला काही दिवस बाकी होते , मी कॉलेजला जायचा प्रश्नच नव्हता ... त्यामुळे तिने माझ्या कॉलेजला प्रवेश घेतला असेल का असा विचार मनात आला.... मी सायकल घेऊन बाहेर पडलो ...


तर ती वाटेतच मला भेटली ...


" कुमार कुठे जात आहेस ? "


" बस सहज निघालो "


" तुझं कॉलेज सुरु नाही झालं का ? "


" नाही , पण का विचारलं ? "


" मी तुझ्याच कॉलेजला अकरावीला प्रवेश घेतला ना "


मनातच -- 'अरे वा ! मस्त झालं हे तर '


" हो का ? छान केलं ... कसं वाटलं कॉलेज ... ? "


" गर्दी होती ना कॉलेज मध्ये म्हणून कुठे फिरता नाही आलं ... "


" ठीक आहे . "


" कधी पासून अकरावीचे वर्ग सुरु होणार आहे ? "


" तरी १० -१५ दिवस वेळ आहे ... "


" माझे वर्ग सुरु होणार आहेत काही दिवसांनंतर ... "


" हो काय ? लवकर सुरु होणार आहे "


मी तिला " हो , येतो मी " म्हणत तिथून निघालो सुजीतकडे गेलो आणि परत येऊन हि बातमी आधी कबीरला सांगितली ... मला खूप आनंद झाला होता .


माझं कॉलेज सुरु झालं आणि तो दिवस उगवला ... तिचा कॉलेजचा पहिला दिवस , तिने आदल्या दिवशीच आपण सोबतच कॉलेजला जाऊया अस मला सांगितलं होतं ... किती वाजता घरून निघायचं हे सुध्दा तिने मला सांगितलं होतं ... त्यादिवशी मी लवकरच तयार झालो होतो आणि बस आता कॉलेजला जायला निघणार तोच सायकल पंक्चर झालेली मला दिसली ... मग काय नाईलाजाने मला तिच्यासोबत जाता आलं नाही ... सायकल दुरुस्त करून घ्यायला मला घरीच वेळ झाला . मी पंक्चर बनवून सायकल ठीक केली ... मला उशीर झाला होता आणि वर्ग सुरु झाल्यावर कॉलेजला जाणं मला आवडत नव्हतं ... मला सायकल वेळेवर पंक्चर झाल्याने दिवसभर घरी राहावं लागलं याचं वाईट वाटलं ...


मला ठाऊक होतं की कॉलेजचा पहिला दिवस म्हटलं की लवकर सुटी होणार , म्हणून मी सायकल घेऊन ती आली असेल , तर तिला भेटून यावं आणि कॉलेजचा पहिला दिवस कसा गेला तिला विचारावं ... जरावेळ गप्पा मारत बसावं म्हणून घरून निघालो होतो ... तिच्या घरासमोरून जात असता ती अजून घरी आली नव्हती म्हणून मीच सरळ शहराच्या दिशेने निघालो ... काही अडचण तर आली नाही ना असं मला वाटलं त्यामागे एक कारण होतं ........


मी भरधाव सायकल चालवत होतो , रोजच्या सवयीने मी १० मिनिटांत कॉलेज समोर पोहोचलो तेव्हा सर्व जण गेटमधून बाहेर येत असल्याचे दिसून आले ... मी बाजूला थांबून होतो इतक्यात ती सायकल घेऊन घराकडे जायला निघाली होती , मी तिला काही अंतर समोर जाऊ दिलं आणि दुसऱ्या रस्त्याने सायकल वळवून तिच्या बरोबरीत आलो ... तिला मी तिथं अचानक आल्याचं जरा आश्चर्य वाटलं होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावर मला दिसून आलं होतं ....

" कुमार ... "


मी नुसतंच तिच्याकडे पाहिलं ...


" वाह छान , सकाळी सोबत कॉलेजला जाऊ अस म्हणाला होता आणि आता दिसत आहे , घरी परत जातेवेळी ...."


" सॉरी , पण वेळेवर सायकल पंक्चर झाली होती तर मी तरी काय करणार ... "


" हो काय ? बरं ठीक आहे मग तू उशिरा आला होतास का ? "


" नाही , मी कॉलेजला आलोच नाही "


" अच्छा ... मग आता इकडे कसा आला ? "


" सायकल दुरुस्त करायची होती ना .... "


" बरोबर आहे .."


" बरं ते जाऊ दे , कसा होता कॉलेजचा पहिला दिवस ?? "


" तसा बरा होता पण एक गडबड झाली आज .. "


" काय झालं ? "


" ती ही तुझ्यामुळे ... "


"माझ्यामुळे ??? " तिच्याकडे पाहत


" नाहीतर काय , तू सोबत येणार म्हणून मला थोडं बरं वाटलं होतं आणि वेळेवर तू आलाच नाही , पहिला दिवस , सारं काही नवीन म्हणून जरा जास्तच गडबडीने कॉलेजला पोहचले ,

त्यामुळे सायकलची चावी सोबत घ्यायची विसरले मग काय सारखं माझं लक्ष सायकल कडे लागलेलं .... "


" हि गडबड झाली तर .. मग परत येतांनी ? "

continue...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED