Mala Kahi Sangachany - Part - 9 - 10 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय..... - Part - 9 - 10

९. डायरीचं गूढ


कुमारला आपण पूर्ण समजलो नाही .... निदान जिवलग मित्र या नात्याने तरी... असं सुजितला वाटून गेलं... काय लिहलं असेल त्यानं यामध्ये आणि कुणाबद्दल?

मनात असे विचार येत असता त्याने डायरीचं पहिलं पान उघडलं तर पहिल्याच पानावर गर्द लाल रंगाने

"मला काही सांगाचंय"


असं मोत्यासारख्या सुंदर अक्षरात एखाद्या पुस्तकाचं नाव लिहावं तसं लिहलं होतं .... मग या डायरीत काय गुपित दडलं आहे हे पाहण्यासाठी सुजित पान पालटून वाचत होता . ..

दोन तीन पान वाचून झाली न झाली तोच त्याचा फोन वाजायला लागला आणि डायरीच्या पानात बोट ठेवत त्याने फोन घेतला तर

"अरे ,सुजित कुठं आहे तू ?"

त्याचे वडील विचारत होते .


"बाबा मी इथेच आहे बाजूला तुम्ही कुठं आहात? " त्याने विचारले


"मी कुमारच्या आई वडीलाजवळ आहे " त्याचे बाबा म्हणाले.


त्यावर "आलोच मी" म्हणत त्याने फोन ठेवला. आता त्याला ती डायरी पूर्ण वाचून घ्यावी असं वाटतं होत पण नाईलाजाने त्याला ती तशीच परत बॅग मध्ये ठेवावी लागली आणि मागे बॅग ठेवत तो त्याच्या वडीलांजवळ

जाऊ लागला....


जाता जाता हळूच ती बॅग त्याने जवळच्या भिंतीला टेकवून दिली काय म्हणत होता बाबा तुम्ही?


"अरे खूप वेळ झाला ... टिफिन आणला आहे आम्ही , तुमच्यासाठी घरून... तर सोबत दोन दोन घास जेवून घ्या तुमच्यासोबत तरी निदान जेवतील ते....

सुजीतचे वडील त्याना सांगत होते कि खूप म्हटलं ..

पण ते भूक नाही म्हणत शोक करत आहेत काय अवस्था झाली त्यांची रडून रडून.... म्हणून फोन केला तुला आणि आकाशला पण बोलावं जेवण करायला असं म्हणत ते कुमारच्या वडिलांना धीर देत 'चला जेवून घ्या बरं' म्हणत खाली बसविले ....


बराच वेळ समजाविण्यात गेला आणि मोठ्या प्रयत्नाने त्यांनी कुमारच्या आई वडिलांना आणि प्रशांतला थोडं जेवू घातले. रुग्णालयात तसेच कुमारची ती अवस्था पाहिल्याने भूक तर नव्हतीच पण आजूबाजूचं वातावरण आणि औषधांचा दर्प यामुळे घास तोंडातच फिरत होता कसेतरी दोन चार घास सोबत जेवून सर्व उठून बसले आणि जुंन्या कुमार लहान असल्यापासूनच्या गप्पा सांगत त्याची आई रडत होती तर प्रशांत,आकाश ,सुजित जवळ जवळ बसून कान देवून ऐकत होते ...


कुमारच्या बालपणीच्या खोडकर गोष्टी , शाळेत असताना शिक्षक त्याच कौतुक करायचे ती सांगत होती तेव्हा जणू तिथ उपस्थित प्रत्येकाला त्याच्या आठवणीतला कुमार मनात कुठेतरी जागा होत होता तर वास्तविक पाहता तो अजूनही बेडवर तसाच झोपला होता. बऱ्याच वेळ गप्पा सुरु होत्या मग हळूहळू शेजारी घरी जायला लागले आणि पुन्हा शांतता पसरली. सुजित आणि आकाशचे वडील तिथंच थांबले होते... मध्येच कुणी उठून कुमारला जाग आली काय ते पाहण्यासाठी दाराजवळ जाऊन बघत होते, निराश होऊन परत येत होते ..


शेवटी काहीही होवो पण जगण्याची आस प्रत्येकाला असतेच अगदी शेवटचा श्वास असेपर्यंत ... पण इथे पुढल्या क्षणाला समोर काय मांडून ठेवलं आहे याची कल्पनाही नसते कुणाला तरी आपण मी, माझं आणि मीपणा बाळगून असतो ... आपल्या या नश्वर शरीराला अन दुनियेला सदैव एकाच नजरेने पाहत असतो . मला हे करायच आहे ... असंच करायचं आहे .... काहीही झालं तरी काय वाट्टेल ते करावं लागलं तरीही ... असं आपण मनात ठरवून असतो आणि अचानक अगदी अतिचंचल वाऱ्यालाही कळू न देता काळ आपली भूमिका बजावत कधी आपले प्राण हिरावून नेतो कळत नाही .... असं विचारचक्र मनात सुरु असताना सुजित भानावर येऊन दुसऱ्या क्षणाला त्याला डायरीचा विचार मनी आल्याने तो बॅग कुठं ठेवली ते आठवायला लागला आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर बॅग असल्याची त्याला दिसून आली ... पण सर्वजण जागीच असल्याने त्याला त्या डायरीत काय काय गूढ आहे ? असा प्रश्न स्वतःला विचारत योग्य वेळेची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय मिळत नव्हता , शिवाय जर मलाच ठाऊक नव्हतं डायरीबद्दल ते बाकी अजुन कुणाला माहिती असणे अशक्य आहे हे तो जाणून होता....


आता बरीच रात्र झाली होती पण कुणाच्याही डोळ्यावर झोप येत नव्हती. सुखात वेळ कशी निघून जाते कळत नाही तर दुःखात तीच वेळ कधी एकदा रात्र संपून दिवस उजाडेल याचाच विचार आपण करत असतो. ... का झालं असं ? आताकुठे कुमारने घरची जबाबदारी स्वीकारली होती, त्याच्या कुटुंबाला आधार तो देत होता मग अचानक असं का घडावं? यावेळी असे बरेच विचार मनात येत होते.


प्रशांत आईजवळ तिच्या खांद्यावर मान ठेवून बसला होता तर आकाश आणि सुजित तिथेच बाजूला उभे होते. त्त्यांचे वडील अतिदक्षता विभागाच्या दाराजवळ खालीच बसून होते, ते दोघेही कुमारच्या वडिलांना धीर देत होते "ठीक होईल कुमार, तुम्ही काळजी करू नका आणि ऑपरेशनची मुळीच चिंता करू नका आम्ही सोबत आहोत ना " असं बरंच काही दिलासा देत ते एकमेकांशी बोलत होते ....


आज त्यांच्यासाठी ती रात्र जणू पुढं सरकत नव्हती पण वेळ आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत होती. सुजीत मात्र कधी एकदाचा यांना डोळा लागतो आणि कधी ती डायरी वाचायला मिळेल , याचीच वाट पाहत होता. पण म्हणतात ना जोवर ठराविक वेळ येत नाही तोवर काहीही घडत नाही....


आता रात्रीचे अकरा वाजत होते बराच वेळ झाल्याने अन मानसिक ताणामुळे त्यांचा डोळा लागला...

१०. मध्यरात्र


मध्यरात्रीची वेळ। कुमारला ठेवलेल्या अतिदक्षता विभागाच्या दाराजवळच भिंतीला टेकून ते तिन्ही वडील मंडळी डोळे मिटून झोपी गेले होते. तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या बाकावर प्रशांत आईच्या कुशीत निजला होता तर त्याची आई बाकावर बसून असता तिचाही डोळा लागला होता. सुजित आणि आकाश बाजूलाच असलेल्या जिन्याच्या पायरीला टेकून झोपी गेले होते. त्यामुळे तिथं थोडी शांतता पसरली होती, तर बाहेर गार वारा सुटला होता. ज्याची रुग्णालयातील आतल्या कुणालाही कल्पना नव्हती कारण बाहेरची हवा आत यायला जास्त जागा नव्हती तेव्हा वाऱ्यासोबत काही पान एका बंद खिडकीतून आत येत होते ,नर्स किंवा वॉर्डबॉय बहुदा त्या खिडकीला बंद करतेवेळी आतून कडी लावायला विसरले असावेत ....त्यामुळे घामाने चिंब शरीराला गार वारा स्पर्शून गेल्यानं अन वाळलेल्या पानाचा होणारा आवाज ऐकून सुजितला जाग आली. त्याची मुळीच उठायची इच्छा नव्हती पण त्याला तहान सुद्धा लागली असल्याने डोळे चोळत तो उठला आणि पाणी प्यायला गेला, पाणी पिऊन परत येतेवेळी भिंतीला उभी करून ठेवलेली बॅग त्याच्या नजरेस आली आणि तो बॅग जवळ जाऊन हळूच कुणी बघत नाही ना? याची खबरदारी घेत त्याने बॅगमधून डायरी काढली.....


पावलांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत सुजित डायरी घेऊन एकांतात जाऊन बसला आणि त्याने डायरी वाचायला सुरुवात केली. डोळ्यावर झोप असल्याने त्याला डुलकी येत होती म्हणून दोन तीन पान वाचुन झाल्यावर झोप दूर व्हावी म्हणून तो येरझरा मारायला लागला तर आजूबाजूला कुणीही नसल्याने आता त्याला हुरहूर लागत होतं, रुग्णालयात रात्री राहण्याची त्याची पहिलीच वेळ होती ......त्यात सगळीकडे इतकं शांत वातावरण होतं की जरासा जरी आवाज झाला तर मन दचकून जात होत...


जास्तच एकाकी वाटत असल्यामुळे तो आकाश जवळ पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन बसला अन डायरी वाचायला लागला. सुरुवातीची पान वाचत असता त्याला कळून चुकलं कि कुमारने इतक्यात कितीतरी गोष्टी त्याच्यापासून अलिप्त ठेवल्या होत्या. अचानक इतकं एकटेपण कुमारच्या वाटेला कस आलं? हाच प्रश्न त्याला पडला होता आणि जिवलग मित्र असून मला कस कळलं नाही? हा एक सवाल त्याच्या मनात होता.....


ती डायरी वाचत असतांना असे बरेच प्रश्न त्याला पडत होते पण त्यावेळी ती डायरी आधी वाचून काढणं महत्वाचं आहे हे जाणून आणि कदाचित त्या डायरीत आणखी काय काय कुमारने लिहून ठेवल , या प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणून तो वाचत होता. मग मनात आलेले सर्व विचार बाजूला ठेऊन त्याने पुन्हा डायरी वाचायला सुरुवात केली..... आता सुजित पूर्णपणे ती डायरी वाचण्यात मग्न झाला होता...

कुमारने डायरीमध्ये सुरुवातीलाच लिहिलं होतं..


"जीवनात खूप काही बघायचं बाकी आहे आणि खूप काही मिळवायचं बाकी आहे , शिकून मोठ्ठ व्हायच आहे असं मी ठरवलं होतं, मला जन्म दिला , माझे पालन पोषण केलं, मला शिकता यावं यासाठीे कष्ट घेतले .......त्या आई वडिलांना सुखात ठेवायचं असं खुपकाही स्वप्न मी पाहिली होती. बालपणापासून मीही बरेच चांगले वाईट अनुभव घेतले होते आणि आलेल्या संकटांना तोंड देत समोर जात होतो, आज एका गोष्टीचा आनंद आहे पैसा जरी नसला जवळ तरी दोस्त खूप मिळवले. अगदी जिवलग मित्र मिळाले या नश्वर जीवनात , मला जवळपास सर्वांची गुपितं माहीत होती ते स्वतःहून मला सांगायचे त्याच कारण मला कधीच कळलं नाही....


आज खंत याचीच वाटते आहे कि जेव्हा मला गरज आहे आधाराची तर मी कुणालाही माझ्या मनातलं सांगू शकत नाही, इतकं एकटेपण वाटेला येईल आणि स्वतः बद्दल असं काही लिहण्याची वेळ मजवर येईल असं मला वाटलं नव्हतं. आज माझे मन इतके जड झाले आहे की शब्द बनून भावना व्यक्त करणं अशक्य झाले आहे... आणि त्याचसाठी मला पुःन्हा सगळं एकदा सुरुवातीपासून तर आतापर्यंत घडलेलं शब्दांत मांडून जगायचं आहे .... या निमित्तानं सर्वकाही आठवून का हि वेळ यावी ? या प्रश्नाच उत्तरं मिळवायचं आहे... जीवनातील साऱ्या आठवणी मोत्यासारख्या या पेन आणि कागदाच्या मिलनातून एका दोरात ओवायच्या आहेत....


परिस्थिती काहीही असो , समस्या कोणतीही असो, मी सर्वांना धीर देत होतो. संयमाने त्या वेळेचा सामना करायला सांगत होतो आणि माझ्या मित्रांना सावरत होतो पण आज माझी अवस्था अशी आहे की दुःख सांगून मन मोकळं न झाल्याने अश्रू पापण्यांवर रोखून ठेवले आहेत. ..... कधी हक्काचा खांदा आधार म्हणून मिळेल आणि मनसोक्त रडता येईल असं होऊन गेलं पण आता सगळं असह्य झालं तेव्हा कोणी महान शायरीकारचं लिखाण आठवलं ते म्हणतात की ....


"मनातील जसं शिल्पात साकारता येते तसंच कधी कधी शब्दात साकारता येते आणि मनं हलकं व्हायला मदत होते."


म्हणून मला जे काय घडलं ते लिहावं लागत आहे.... आपण म्हणत असतो की जे काही आपण आज करतो त्याची छाया किंवा परिणाम आपल्या भविष्यावर होत असतो ....


तेव्हा मी नेमका कुठं चुकलो याची मला कल्पना आहे पण ती गोष्ट चुकीची आहे की नाही हेच मला अजून कळलं नाही. ती गोष्ट आहे 'प्रेम'. पण ते तर नैसर्गिक आहे मग मी चुक केली की नाही,ती माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मलाही प्रेम नावच फक्त माहित होतं पण जेव्हा ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला प्रेमाची प्रचिती आली ती जीवनात आली आणि जीवन जगतांना एक वेगळाच आनंद मी अनुभवत होतो...


जवळपास चार वर्षे झाली मी तिला शेवटचं पाहिलं पण आजही ती माझ्या मनात घर करून आहे अगदी पहिल्या वेळेस तिला पाहिलं तशीच । पहिल्या भेटीनंतर कधी मैत्री होऊन तिच्या सहवासाची मला सवय झाली कळलंच नाही. असंच होत ना प्रेमात, कधी आपण स्वतःला विसरून समोरच्या व्यक्तीला मन समर्पण करून त्या व्यक्तीचं होऊन बसतो, तिची काळजी घ्यायला लागतो, त्याच व्यक्तीचा विचार करत राहतो, वास्तवाचे भान हरपून एका वेगळ्याच भावविश्वात आपण जगत असतो आणि त्यावेळी जे काय आपण अनुभवत असतो त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं जमणार नाही कारण स्वप्नात जे घडतं तसंच वास्तवात घडू शकत नाही... ती समोर असतांना वेळ तिथंच थांबून रहावी असं वाटायचं आणि तिने असच माझ्याशी बोलत रहावं सतत असं वाटायचं.... असेच दिवस जात होते अन प्रत्येक दिवशी तिच्या भेटीची मला ओढ लागली होती, तिचा चेहरा बघितला नाही तर वाटायचं जणू आज दिवस उजाळलाच नाही..."


कुमारने असं लिहिलेलं वाचत असताना मध्यरात्र उलटून गेल्याचं सुजितला कळलं नाही तो वास्तव विसरून कुमारच्या भावविश्वात जगत होता. समोर वाचत असता त्याला कधी हसू येत होत तर कधी तो खूप भावूक होत होता. सुजितने पहाटेच्या 5 वाजेपर्यंत संपूर्ण डायरी वाचून काढली...


आता मनात असंख्य विचार आणि प्रश्न यायला लागले होते... कुमारने कधीच तिच्याबददल मला सांगितलं नाही ... का सांगितलं नाही? इतकं सगळं घडलं पण त्यानं कधी कधी म्हणून मला सांगणं गरजेचं नाही समजलं... मी मात्र त्याला प्रत्येक बारीकसारीक गोष्ट सांगत राहिलो ... माझ्याबद्दल सर्वकाही फक्त आणि फक्त कुमारलाच माहित आहे.... मग का त्यानं असं वागावं ? एक अनोळखी व्यक्तिसारखं जणू मला तो त्याचं दुःख समजून घेण्याबद्दल साशंक असावा....


कुमार ला तो जवळजवळ 8 ते 10 वर्षांपासून ओळखत होता .... त्याची पहिली भेट कुमारसोबत झाली ती 8 वीच्या वर्गात ... पण आज डायरी वाचून झाल्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता कि खरंच इतकी वर्षे झाली , आपल्या मैत्रीला ....? त्या पहिल्या भेटीपासून कुमार आणि त्याची मैत्री घट्ट होत गेली... ते आठवत असता तो कुमारच्या आठवणी जपत पुन्हा एकदा कुमार ने का सर्व सहन करत मला न सांगता गुपित ठेवलं हाच एक प्रश्न त्याला सतावत होता...


डायरी वाचून झाल्याचा आनंद त्याच्या मनात होता तर एकीकडे या सर्व गोष्टी पासून तो अलिप्त असल्याने आज कुमार ची हि अवस्था झाल्याचं त्याला वाटत होत ..... असे बरेच विचार त्याला त्रास देत होते तर सोबत असतांना जे काय क्षण त्त्यांनी एकत्र घालवले त्यानां आठवत तो डोळे मिटून कुमारने वेळोवेळी केलेली मदत , जीवनात संकटांना सामना करतेवेळी त्याचा सल्ला घेऊन तो सावरला ते प्रसंग त्याच्या मनात घोळत होते...... आणि आज कुमारवर काय हि वेळ आली याच दुःख त्यालाही असह्य वेदना देत होती... कुमार ने मला सावरलं.. त्याला मित्र निराश होऊन खचल्याच माहित होताच तो त्यांना जगण्याची नवीन दिशा अन जीवनात जगायला अजून बरचकाही बाकी असल्याचं पटवून देत होता...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED