Mala Kahi Sangachany - Part - 11 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय.... - Part - 11

११. एक नवीन पहाट


डायरी वाचत असता पहाटेचे 5 केव्हा वाजले सुजितला कळलं नाही. डायरीचे शेवटचे पान वाचून झाल्यावर त्याने डायरी बंद करत पापण्यांवर थांबलेले आसवं पुसले. डायरी मांडीवर ठेवून तो तसाच बसला होता, आता त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते, रात्री 12 वाजल्यापासून तो जागी होता पण त्याला झोप येत नव्हती कदाचित डायरीत कुमारने जे काय लिहिलं होतं यामुळे; अनेक प्रश्न त्याला पडले होते मग विचार करत असता कुमारच्या आठवणी मनात गर्दी करायला लागल्या अन विचार करत असताच त्याचा डोळा लागला अन त्याला झोप लागली पण एक दीड तास झाला न झालाच वाहनांचा आवाज आल्याने त्याला जाग आली, शहर जाग झालं होतं, गावाकडे चिमण्या पाखरांचा किलबिलाट सुरु झाला की पहाट होते तर इकडे शहरात पहाटेच वाहनाची वर्दळ सुरु होते अन त्याचबरोबर वाहनांचा कर्कश आवाज।


जिल्हा रुग्णालय शहराच्या मुख्य रस्ताला लागूनच असल्याने तिथे वाहनांची जरा जास्तच ये जा होत असे. सुजित जागा होऊन आजूबाजूला पाहत होता तर सर्व वडीलमंडळी उठून कुमारला दाराच्या काचेतून पाहत होते, प्रशांत आणि आकाश झोपूनच होते तर कुमारची आई समोरून येत असल्याचे त्याला दिसले मग तो लगेच उठून उभा राहिला..


कुमारची आई ओला चेहरा साडीच्या पदराला पुसत होती, समोर चालत येत होती. सुजित चेहरावरून हात फिरवत जागीच उभा होता मग आळस काढत तो तिच्या पुढे चालत जाऊन बॅगजवळ पोहोचला आणि त्याने डायरी परत बॅगमध्ये ठेवली. मग बॅग बाजूला सारून तो, जिथे सर्व गोळा झाले होते म्हणजेच ICU च्या दाराजवळ गेला आणि कुमारला पाहू लागला जसे बाकीचे पाहत होते. इतक्यात सुजितचे वडील म्हणाले चला, हात पाय धुवून घेऊया आणि ते जायला लागले , सुजित आकाश आणि प्रशांतला उठवणार इतक्यात त्या दोघांनाही जाग आली मग ते तिघेेही हात पाय धुवून आले ...... सर्वांनी एकत्र चहा घेतला आणि ते सर्व डॉक्टर येण्याची वाट पाहत होते. आता जवळ जवळ सकाळचे ८:३० वाजले होते ......


नर्स चेकअप करण्यासाठी वॉर्डमध्ये फेऱ्या मारीत होत्या, तेव्हा दोन नर्स कुमारला चेक करायला आल्या आणि आत गेल्या. जे काय पाहायचं ते पाहून कुमारला तपासून त्या बाहेर आल्या. मग सर्वजण त्यांना कुमार कसा आहे विचारत होते त्यावर अजून त्याच्या तब्येतीत काही सुधार नसल्याचे नर्सनी सांगितले आणि या निघून गेल्या. त्याची आई डोळ्यातील आसवं पदराने टिपत खाली बसली. काल त्याला पाहायला आल्यापासून ते आतापर्यंत ती माउली मनात एकच आस लावून होती ...


आता पुन्हा तिला शोक आवरत नव्हता, ती रडत होती. प्रशांत तिला समजावीत होता...


"आई, ठीक होईल दादा तू रडू नको"


असाच काही वेळ निघून गेला. रात्री उशिरा आणि एकदम थोडचं जेवण केल्याने आकाश आणि कुमारचे वडिलांनी नास्ता आणला आणि त्या वेळी कुणालाही काही खायची इच्छा नव्हती म्हणून सर्वांनी थोडा थोडा नास्ता घेतला ... काही वेळातच डॉक्टर आले. केबिनमध्ये जाऊन लगेच दुसरीकडे कुठे न जाता ICU मध्ये जाऊन त्याला तपासले....


डॉक्टर कुमारला चेक करून बाहेर आले, कुमारच्या आई वडिलांजवळ येऊन म्हणाले .....


"कुमार होता तसाच आहे अजूनही, मी सिटी स्कॅनचा रिपोर्ट पुन्हा एकदा पाहतो पण ऑपरेशन शिवाय काहीही उपाय नाही. तेव्हा तुम्ही तयारीत रहा बहुदा आजच ऑपरेशन करावं लागणार. येतो मी" असं म्हणत डॉक्टर जायला लागले तेव्हा आकाश आणि सुजित चे वडील डॉक्टरांना थांबवून ..


"सर, दोन मिनिटं थांबा, कुमारच्या ऑपरेशनला किती खर्च येईल आणि दरम्यान त्याला काही होणार नाही ना? कारण सध्या त्याच्या घरचा कर्ता तोच आहे आणि त्याच्या घरची परिस्थिती मध्यम आहे.."


त्यावर डॉक्टर म्हणाले "किमान तीस हजार रुपये खर्च येईल आणि आम्ही आमचे 100 टक्के प्रयत्न करणार आहोत तुंम्ही मुळीच काळजी करु नका बाकी त्यांच्या कुटुंबियांना आधार देत रहा ...

ओके आय शुड गो नाऊ....."


डॉक्टर निघून गेल्यावर ते दोघे कुमारच्या आई वडिलांजवळ येऊन त्यांना धीर देत म्हणत होते "काळजी करू नका सगळं ठीक होईल, आम्ही बोललो डॉक्टरांशी. ऑपरेशन झालं की बरा होईल म्हणाले कुमार , तर आपण घरी जायला हवं म्हणजे आपणाला ऑपरेशन करिता आवश्यक तयारी करता येईल...."


आकाश, कुमारचे आई वडील आणि सुजितचे वडील असे चार जण , दोन दुचाकी सोबत घेऊन गावी जाण्यास निघाले, ऑपरेशनसाठी जे काय आवश्यक पैशाची व्यवस्था करण्यासाठी; तर प्रशांत, आकाशचे वडील आणि सुजित तिथेच कुमारजवळ थांबले होते. रुग्णालयात रुग्णांना पाहण्यास नातेवाईकांची ये जा सुरु झाली होती ... पण तरी शांतता कायम होती ... तर बाहेर लोक रस्ताने रोजच्या कामावर जात होते रस्तावर बरीच वाहन जात होती काही हळू तर काही वेगात जात होती.... त्या सर्वांसाठी तो दिवस रोजच्यासारखाच होता तर कालचा दिवस कुमार आणि त्याच्या कुटुंबासाठी ...., एक नवीन पहाट घेऊन आला होता ज्याची त्यांना काहीएक कल्पना नव्हती सुजित बाहेर येऊन पायरीवर बसला ... आता एकटा असल्याने डायरीत वाचलेलं त्याच्या मनात उमटत होतं विचार करतच त्याने मोबाईल बाहेर काढून त्यामध्ये कुमारचं सिमकार्ड टाकलं आणि कुमारच्या सिमकार्ड मधला नंबर काढून फोन लावला.


सुजितने फोन लावला आणि दुसऱ्या बाजूने फोन घेण्याची तो वाट पाहत होता पण बऱ्याचवेळा फोन लावून कुणीही फोन घेत नसल्याने तो हताश झाला आणि मनात येणारे अनेक प्रश्न अन विचारांची कालवाकालव यामुळे त्याच डोकं जड झालं ... तेव्हा पायरीवरून उठुन तो आत प्रशांतजवळ गेला. त्याला डायरीबद्दल सांगावं असा विचार त्याच्या मनात येऊन गेला पण त्याने स्वतःला सावरलं....


प्रशांत ICU जवळच्या त्याच बाकावर बसून होता. सुजित त्याच्या बाजूला बसला तरी याची त्याला किंचितही जाणीव झाली नाही... तो त्याच्या खिन्न झालेल्या चेहऱ्याकडे बाराकाईने पाहत त्याच्या मनात काय चाललं असणार याचा विचार करत ....


"प्रशांत ...प्रशांत..." असा त्याचा खांदा हळूच हलवून त्याला आवाज दिला...


भानावर येवून प्रशांत "हं... काय..काय झालं.?"


"अरे असं काय करतोस ? सांभाळ जरा स्वतःला."


"कस सावरू ? कसा सांभाळू स्वतःला...?... तूच सांग ना सुजित दादा.."


"अरे ठीक होईल कुमार...आणि तू काय लहान आहेस का आता ..? तू तर आई बाबांना धीर द्यायला हवा...आता."


"दादा म्हणायचा नेहमी...अजून तू लहान आहे ...दादाने असं म्हटलं की वाटायचं मी बाळंच आहे जणू... नेहमी मला तो सांभाळून घेतो ..."


"अरे ते सगळं ठीक आहे पण आता जी वेळ आली आहे .... तु स्वतः सावर आणि आई बाबा ना सुद्धा...प्रत्येकाला जीवनात अश्या वेळी मोठ्ठ व्हायची संधी मिळते...आणि

एकदा सर्वांना मोठं व्हावच लागतं ...आपली जबाबदारी घ्यावीच लागते.... कुमारने नाही का घेतली....?"


सुजित त्याला त्या धक्यातून सावरून त्याच मन जे दडपण असह्य झाल्याने जड झालं होतं त्यातून त्याला मोकळं करायचा प्रयत्न करीत होता..... यांत त्याला यश मिळाल्याचं जाणवत होतं....


हे असं रुग्णालयात सर्व जागीच थांबलं होतं तर तेथून खूप दूर एका शहरात जिथं याच शहरासारखं लोकवस्ती, मोठमोठया इमारती, वाहनांची वर्दळ आणि त्यांचा आवाज , आकाशाला भिडणारे धुराचे लोट अगदी जसेच्या तसे होते.... रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची ये जा सुरु होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही दुकान उघडलेली , थोडं पुढं जाता भाजीबाजार, फळांच्या गाड्या, काही दुकाने होती. तेव्हा गर्दीतून एक व्यक्ती भाजीची पिशवी हाती घेऊन पाठमोरी जातांना ..... तिने आकाशी रंगाची साडी नेसलेली, लांब केसाची वेणी घातलेली, उंचीला शोभेल अशी डौलदार शरीरयष्टी आणि मोहून टाकणारी देहबोली असलेली, भर उन्हात पायी चालत असल्याने घामाचे थेंब तिच्या मस्तकावरून खाली येत होते म्हणून जरा घाईतच ती बहुदा घरी जात होती....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED