भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ३)

  • 7.1k
  • 3.4k

" तुम्ही मघाशी ओरडलात ना... ऑफिसमध्ये.. नक्कीच हिने चिमटा काढला असेल.. " सुप्रीने संजनाच्या पाठीवर हळूच चापटी मारली. " तुम्ही कोण ? "," मी कोमल... travel blogger आहे. एका मॅगजीन साठी लिहिते मी. "," खूप छान... फिरायला आवडते वाटते... बरं आहे.. मी सुप्रिया... हिची लहानपणापासूनची मैत्रिण.. हिचं जास्त मनाला लावून घेऊ नका.. आणि मला माहित आहे, तुमचा कोणता विषय सुरु आहे ते.... ह्या संजूला ना वेडं लागलं आहे... काहीही करते, कोणालाही बोलावते आणि डोळ्यांचा नळ सुरु करते. ये रडू बाई.. हसतेस कि करू गुदगुल्या... " सुप्रिया संजनाकडे पाहत बोलली. तशी संजनाने हलकीशी smile दिली. " मी हिला जेवायला बोलवायला आलेले.. तुम्ही येता