काळ

  • 5.4k
  • 1.4k

आजचा दिवस तसा बर्यापैकी कल्लोळ माजवतच सुरू झाला होता. चोहोबाजुंनी होणारा निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणातील जिवंतपणा स्पष्ट करत होता. पसरवलेल्या आपल्या फांद्या हलवत बहुतांश डेरेदार वृक्ष त्या प्रसंगी आपणही या जीवसृष्टीचाच एक भाग आहोत असेच काहीसे दर्शवीत होते. चिंच, फणस, आंब्याची झाडे आपल्या अगणित अश्या लवलवीत फुटलेल्या पानांचा सळसळाट करत त्या ध्वनीनिर्मितीशी आपल्या परीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. दूरच्या एका कोपर्यात विरळ वाढलेल्या बोरीच्या झाडांखाली तीन-चार सांबरं हालचाल करत दिसत होती. पुढचे पाय वर करून आणि दोन पायांवर उभे राहून त्यातले एक सांबर बोरीचा पाला खात होते. जमिनीच्या निसर्गनिर्मित दगडी बांधाला खाली लागूनच असलेला ओढा पूर्णपणे