नातू माझा भला !

  • 20.5k
  • 1
  • 4.8k

= नातू माझा भला! = दुपारचे दोन वाजत होते. मे महिन्यातले ऊन प्रचंड आग ओकत होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. 'सूर्यकिरण' या वसाहतीत असलेल्या एका सदनिकेत ओंकार मस्तपैकी खेळत होता. ओंकारचे खेळणे म्हणजे नुसता धिंगाणाच धिंगाणा! नुकतीच त्याची पाचव्या वर्गाची परीक्षा संपली होती. पोहणे, क्रिकेट, हस्ताक्षर सुधार अशा विविध कार्यक्रमांना आठ-दहा दिवस सुट्टी असल्यामुळे ओंकारजवळ भरपूर वेळ होता. त्यामुळे त्याचा मनसोक्त धिंगाणा सुरु असे. दिवाणखान्यात खेळणाऱ्या ओंकारला अचानक काही तरी आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भावनांनी गर्दी केली. मांजराच्या पावलाने तो आजीच्या खोलीजवळ पोहोचला.