आमची मिस... आजी - कादंबरी
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी बाल कथा
चंदामामा आणि आमरस! सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची आई स्वयंपाक।घरात स्वयंपाक करत होती. रामचे बाबा खाली बसून आंब्याचा रस करत होते. रामची आत्या ...अजून वाचाहोती. तिने खास कोकणचा राजा म्हणून ख्याती असलेला रसाळ, मधाळ, चविष्ट असा आंबा खास रामसाठी पाठवला होता. राम आजीसोबत गप्पा मारत बाबा कसे रस करत आहेत याचे बारकाईने निरीक्षण करत होता. राम अत्यंत हुशार आणि चौकस मुलगा होता. प्रत्येक गोष्ट शांततेने समजावून घेण्याकडे त्याचा कल असे. त्यांच्या गॅलरीतून
चंदामामा आणि आमरस! सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची आई स्वयंपाक।घरात स्वयंपाक करत होती. रामचे बाबा खाली बसून आंब्याचा रस करत होते. रामची आत्या ...अजून वाचाहोती. तिने खास कोकणचा राजा म्हणून ख्याती असलेला रसाळ, मधाळ, चविष्ट असा आंबा खास रामसाठी पाठवला होता. राम आजीसोबत गप्पा मारत बाबा कसे रस करत आहेत याचे बारकाईने निरीक्षण करत होता. राम अत्यंत हुशार आणि चौकस मुलगा होता. प्रत्येक गोष्ट शांततेने समजावून घेण्याकडे त्याचा कल असे. त्यांच्या गॅलरीतून
श्यामची पत्रावळ ! दुपारचे तीन वाजत होते. श्याम नुकताच शाळेतून परतला होता. आल्याबरोबर त्याने शाळेचे दप्तर टेबलवर ठेवले. आईकडे हसून बघत त्याने दप्तर उघडून एक पुस्तक काढले. ते ...अजून वाचाआईच्या हातात देत श्याम म्हणाला, "आई, हे बघ मला हे पुस्तक बक्षीस मिळाले आहे." श्यामच्या हातातले पुस्तक घेऊन श्यामकडे कौतुकाने बघत आई म्हणाली, "अरे, व्वा! बक्षीस मिळाले. तेही सानेगुरुजींचे पुस्तक. अभिनंदन! पण बक्षीस कशासाठी मिळाले ते नाही सांगितले?" "आई,आज आमच्या शाळेत सानेगुरुजी वाचनमाला या संस्थेची माणसं आली होती.
**** श्रावणबाळ !**** रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात दहावीपर्यंत शाळा होती. दोन-तीन दवाखाने होते. एक बँकही होती. रामपूर या गावात लक्ष्मण नावाचा एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. रोजमजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ ...अजून वाचाहोता. त्याच्या पत्नीचे नाव ऊर्मिला असे होते. त्यांना विजय नावाचा एक मुलगा होता. नाव विजय असले तरी सारेजण त्याला 'श्रावणबाळ' याच नावाने बोलावत असत.त्याला कारणही तसेच होते. विजयला घरातील कामे करायला आवडत असे. लहानपणापासून तो कोणते ना कोणते काम करीत असे.किराणा दुकानातून साखरपत्ती, तेल, दूध अशा छोट्या छोट्या वस्तू तो
■■ कविता कालची..शिकवण आजची! ■■ ...अजून वाचा * गोरी गोरी पान... * माधवी शाळेतून घरी आली. नेहमीप्रमाणे तिची आई दीपिका दारात उभी नसल्याचे पाहून माधवीला आश्चर्य वाटले. दार उघडे होते. आई काय करते हे पाहावे म्हणून माधवी आवाज न करता घरात आली. तेव्हा तिने बघितले की, तिची आई डोळे लावून शांतपणे बसली होती. दूरदर्शनवर असलेल्या आकाशवाणी केंद्रावर लागलेले गाणे ऐकण्यात तल्लीन झाली होती. ती गाणे ऐकण्यात एवढी रंगून गेली होती की, माधवी येऊन तिच्या शेजारी बसल्याचेही तिच्या लक्षात आले नाही. गाणे ऐकताना तिचे डोळे बंद झाले होते. ओठ ऐकू
= नातू माझा भला! = दुपारचे दोन वाजत होते. मे महिन्यातले ऊन प्रचंड आग ओकत होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. 'सूर्यकिरण' या वसाहतीत असलेल्या एका सदनिकेत ओंकार मस्तपैकी खेळत होता. ओंकारचे खेळणे म्हणजे नुसता धिंगाणाच ...अजून वाचानुकतीच त्याची पाचव्या वर्गाची परीक्षा संपली होती. पोहणे, क्रिकेट, हस्ताक्षर सुधार अशा विविध कार्यक्रमांना आठ-दहा दिवस सुट्टी असल्यामुळे ओंकारजवळ भरपूर वेळ होता. त्यामुळे त्याचा मनसोक्त धिंगाणा सुरु असे. दिवाणखान्यात खेळणाऱ्या ओंकारला अचानक काही तरी आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भावनांनी गर्दी केली. मांजराच्या पावलाने तो आजीच्या खोलीजवळ पोहोचला.
विश्वास जिंकला! विश्वास! दहा वर्षीय चुणचुणीत मुलगा. मराठी चौथी वर्गात शिकत होता. घरची आर्थिक परिस्थिती तशी यथातथाच होती. त्याच्या घरी तो, त्याचे आई-वडील, मोठा भाऊ आणि त्याच्या पेक्षा मोठी एक ...अजून वाचापाच जणांचे कुटुंब! विश्वास आणि त्याचे भावंडं सारे शिकत होते. वडील एका खाजगी शाळेत शिक्षक होते. आई घरीच असायची. ती चाळ तशी मध्यमवर्गीय लोकांची होती. परंतु काही घरे मात्र त्यामानाने श्रीमंत होती. विश्वासच्या घराला लागून एक खूप मोठी इमारत होती. इमारतीचा बाह्य भाग पाहताक्षणी जाणवायचे की, त्या घरात लक्ष्मी नांदते आहे. त्या इमारतीमध्ये एक कुटुंब राहत होते. अरुण आणि अरुंधती अशी त्या घरात राहणाऱ्या जोडप्याचे नाव होते. त्यांना
* बक्षिसाची किमया! * त्यादिवशी दुपारच्या सत्रात सातव्या वर्गावर शिकवत असताना एक पालक एका हाताने एका विद्यार्थ्याला ओढत आणत होता. सोबतच दुसऱ्या हातात असलेल्या छडीने त्याला मारत मारत आणत होता. मी त्या ...अजून वाचापाहिले आणि मला आठवलं की, त्या मुलाला दररोज कुणी ना कुणी असेच रट्टे देत आणून सोडते. बरे,मुलगाही लहान नव्हता. सातव्या वर्गात शिकणारा म्हणजे चांगले बारा-तेरा वर्षाचे वय होते. शिवाय अंगापिंडाने मजबूत होता. शाळेत येण्याचा मात्र त्याला भरपूर कंटाळा होता. घरून कुणीतरी मारत आणायचे. शाळेत आला की, अगोदरच्या दिवशी आला नाही म्हणून शिक्षकही शिक्षा करत असत."अरेरे! काय झाले?" मी त्या दोघांकडे पाहून विचारले."काय व्हायचं? शाळेत येतच नाही." वैतागलेला
* आमच्या मिस ... आजी! * 'स्माईल इंग्लिश' स्कुलच्या पहिल्या वर्गात छोटा समीर शिकत होता. शाळा सुटण्याची वेळ होत होती. इवलीशी, गोजिरवाणी बालके थकून, सुकून गेली होती. तरीही मित्रांसोबत खेळत ...अजून वाचात्यांच्या हालचालींमध्ये काही मिनिटांपूर्वीचा उत्साह, जोश, स्फूर्ती नव्हती तर एक प्रकारची मरगळ होती. समीर एका आसनावर शांत बसला होता ते पाहून त्याच्या मिस त्याच्याजवळ जाऊन म्हणाल्या,"हाय समीर! हाऊ आर यू? काय झाले? असा उदास का बसला आहेस? आपल्या शाळेचे नाव...""स्माईल इंग्लिश स्कुल आहे... माहिती आहे,
* प्रोत्साहन * काही वर्षांपूर्वी शिक्षक या पदावरून निवृत्त झालेले जोशीकाका दिवाणखान्यात रविवारचे वर्तमानपत्र वाचत बसलेले असताना त्यांच्या हरिनाम संकुलात राहणारा, चौथ्या वर्गात शिकणारा राम नावाचा मुलगा त्यांच्या घरी आला. ...अजून वाचासंकुलातील तीन मजल्यावर सहा कुटुंबं राहात होती. त्यापैकी एक कुटुंब म्हणजे जोशीकाका आणि काकू! जोशीकाका-काकूंनाही लहान मुलांची खूप आवड असल्यामुळे संकुलातील मुले त्यांच्या अवतीभवती राहात असत. जोशीकाका दररोज सायंकाळी संकुलाच्या वाहनतळावर सर्व मुलांना एकत्र जमवून 'परवंचा' घेत असत. संस्कार गीते,बडबडगीते, छोट्या बोधकथा त्यांना सांगत असत. सोबतच मुलांनी शाळेत शिकलेल्या कविता आणि गोष्टी मुलांना सांगायला लावत. कुणी त्यास 'संस्कार वर्ग' म्हणे तर कुणी 'बाल आनंद मेळावा' असे म्हणत असे.
°° ओळखपत्र °° सायंकाळचे सात वाजत होते. विजया आणि अनिल हे दोघे पतीपत्नी कार्यालयातून घरी परतले होते. शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दोघेही आनंदी होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा ...अजून वाचाखूप खुशीत होता. अजित त्याच्या आजोबांसोबत शनिवारी सकाळी आत्याकडे जाणार होता. आत्याकडे राहणाऱ्या आजीला भेटायला मिळणार म्हणून अजितचा आनंद गगनात मावत नव्हता. "अजित, माझी बॅग भरून तयार आहे. तू तुझी बॅग कधी भरणार आहेस?" आजोबांनी विचारले. "माझी बॅग आई भरून देणार आहे. आई, कधी देणार आहेस?" "देते.