आईचा वाढदिवस

  • 9.1k
  • 2.1k

कथा – आईचा वाढदिवस. --------------------------------------------- गेल्या महिन्यापासून सुजित पहात होता की , त्याचा मित्र सचिन सध्या खूपच घाईत असल्या सारखा वागतो आहे . शाळेत ,वर्गात , नंतरच्या ट्युशन क्लासमध्ये तो स्थिर नसतो हे सुजितला जाणवत होते . या मित्राच्या मनात सतत काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत “,आणि त्यामुळे त्याचे इतर गोष्टीत अजिबात लक्ष नसते, वरवर तो व्यवस्थित आहे असे दाखवतो . पण तसे नाहीये ..हे सुजितला जाणवत होते. असे असले तरी , सचिन कडून चुका होत आहेत , त्याचे नीट लक्ष नाही , अशी तक्रार करण्याची एक ही संधी सचिन कुणाला देत नव्हता. कारण ..प्रत्येक गोष्ट सचिन अगदी व्यवस्थित करतो,