गांवआश्या

  • 5.4k
  • 1.7k

इतक्या मोठ्या आयुष्यात आपल्याला खूप माणसं भेटतात. कधी ते एका कॉलनीत राहतात म्हणून ओळखीचे होतात, कधी एकाच शाळेत / कॉलेजात असतात म्हणून ओळखीचे होतात तर कधी मित्रांचे मित्र असतात म्हणून ओळखीचे होतात. जसजसे वय वाढत जाते, नोकरी धंदा सुरु होतो तसतसे यातील बरेच जण काळाच्या ओघात कुठेतरी हरवतात. पण काही जण मात्र त्यातल्या त्यात स्पेशल बनतात आणि कायम स्वरूपी लक्षात राहतात. असे सगळे जण मित्रच असतील असे मात्र नाही हं. माझ्या अशाच एका मित्राबद्दल मी बोलणार आहे. त्याचं नांव गांवआश्या. म्हणजे त्याच्या घरच्यांनी त्याचं नांव चांगलं ‘अशोक’ असं ठेवलं होतं, पण हा नेहमी गावातच उंडारक्या करत फिरायचा म्हणून सगळे गांव