जुगारी - (भाग - 4)

  • 9.1k
  • 4.4k

मागील भागावरून पुढे..... राज ने सुषमाच्या हट्टामुळे गेम टाकली तर होती. पण आता पर्यंतचा त्याचा रेकॉर्ड बघता ती गेम फेल होणार ह्या बद्दल त्याच्या मनात बिलकुल शंका नव्हती. म्हणून आता साडे चार झाले तरी त्याला उठून खबर काय आली ते बघावेसे वाटत नव्हते. तो तसाच विषन्न अवस्थेत तिथे बसून होता. काही वेळानी मोरे मावशीच त्याला शोधात तिथे आली. " अरे राज तु इथे बसला आहेस ? मी तुला कुठे कुठे म्हणून शोधले नाही... कसली गेम काढली होतीस रे तु ? "" मावशी, मी तुम्हाला म्हणालोच होतो. तुम्ही आज माझी गेम खेळू नका. मला माहीत होते कि मी खेळलो तर गेम पास होत नाही..पण