Jugaari - 4 books and stories free download online pdf in Marathi

जुगारी - (भाग - 4)

मागील भागावरून पुढे.....


राज ने सुषमाच्या हट्टामुळे गेम टाकली तर होती. पण आता पर्यंतचा त्याचा रेकॉर्ड बघता ती गेम फेल होणार ह्या बद्दल त्याच्या मनात बिलकुल शंका नव्हती. म्हणून आता साडे चार झाले तरी त्याला उठून खबर काय आली ते बघावेसे वाटत नव्हते. तो तसाच विषन्न अवस्थेत तिथे बसून होता.

काही वेळानी मोरे मावशीच त्याला शोधात तिथे आली.

" अरे राज तु इथे बसला आहेस ? मी तुला कुठे कुठे म्हणून शोधले नाही... कसली गेम काढली होतीस रे तु ? "

" मावशी, मी तुम्हाला म्हणालोच होतो. तुम्ही आज माझी गेम खेळू नका. मला माहीत होते कि मी खेळलो तर गेम पास होत नाही..पण कोणीतरी बोलले म्हणून मी आज गेम टाकायला आलो नाहीतर आलो पण नसतो.. उगाचच तुमचे पैसे पण गेले नां..." राज दुःखाने म्हणाला...

" अरे बाळा , कोण म्हणाले कि तुझी गेम फेल झाली म्हणून...मला माहीत नाही तुला कोण म्हणाले, पण जे कोणी म्हणाले ती व्यक्ती तुझ्या साठी लकी आहे रे.. आज तुझीच गेम पास झाली आहे... आणी तुझ्या मुळे मला म्हातारीला पण चार पैसे मिळाले.. माझ्या पण अडचणी दूर झाल्या... देव भलं करो तुझे बाळा..." मोरे मावशीने अक्षरशः त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला.
तिचे बोलणे ऐकून राज ताडकन उठला. त्याला खरोखर तिच्या बोलण्यावर विश्वास वाटत नव्हता...

मावशी पाठोपाठ तो अड्डयाच्या दिशेने चालू लागला. सगळे आज त्याच्याकडेच बघत होते. बऱ्याच वर्षांनी त्याने स्वतः टाकलेली गेम आज पास झाली होती. ज्या लोकांनी विश्वास ठेऊन त्याची गेम टाकली होती. ते खुश होते तर ज्या लोकांनी त्याची गेम येणार नाही अश्या आत्मविश्वासाने दुसरी गेम टाकली होती त्यांची तोंडे बघण्यासारखी झाली होती.

अड्ड्यावर येऊन राज ने फलकावर नजर टाकली. कल्याण बाजार च्या खाली 379/7असे लिहले होते. त्याने समाधानाने खिसा चाचपडला. चिठ्या खिशातच होत्या.

" वा.. ! राज भाई, आज तो कमाल किया. आज तेरा गेम पास हो ही गया. " भास्कर अण्णा पडक्या चेहऱ्याने म्हणाला.

" हा अण्णा... "

" पर मुझे घाटे में डाल दिया ना... मैने गेम उपर डाला नाही था.....अब क्या आयेगा...? "

" मेरे हिसाब से 7/2 आना चाहिये... "

" पाना ? "

" पाना नही बैठ रहा है. "

" ह्म्म्म... "

राज ला आता तिथे थांबण्यात सारस्य नव्हते त्याने सिंगल सत्याचे अठरा हजार चे वळण घेतले. त्याच्या जोड्या रनींग मध्ये होत्या. क्लोज ची खबर आल्यावर जोडी पास कि फेल ते कळणार होते. पान्याचे त्याचे पस्तीस हजार रुपयाचे वळण होते. पण पाना ही OTC होता. त्यामुळे क्लोज ची खबर येई पर्यंत वळण साठी थांबावे लागणार होते. म्हणून घरी जाऊया असा विचार करून राज आपल्या बाईक च्या दिशेने वळला..

तो अगदी खुशीत घरी आला. खुप दिवसाचा त्याचा वनवास आज संपला होता. त्यामुळे अगदी गुणगुणत तो घरी आला. तर घराला टाळे होते.

आता ही कुठे गेली ? मनातल्या मनात विचार करत तो दारापाशी थांबला. येईल... जवळपास कुठे गेली असेल असा विचार करून तो तिथेच दाराजवळ बसून राहिला. बघत बघत दीड एक तास झाला आणी साधारण सहा एक वाजता सुषमा परत आली. हातात मोठ्या पिशव्या..

" अरे तु लवकर आलास ? मला वाटले कि तु नेहमी प्रमाणे साडे सहा वाजे पर्यंत येशील म्हणून मी बाजारात गेली होती." त्याच्या हातात सगळ्या पिशव्या देत तिने दाराला लावलेले टाळे उघडले.

" तु बस मी पटकन चहा करते.. " असे म्हणून ती किचन मध्ये गेली.

काय एव्हडी खरेदी केली आहे म्हणून त्याने सहज पिशव्या उघडून बघितल्या... पोळपाट लाटणं , चहा साठी नवीन कप , गाळणी , क्लिप्स असे काय काय नी किती तरी सामान ती घेऊन आली होती. सगळे बघताना अचानक त्याच्या हाताला तिने नवीनच घेतलेली अंतरवस्त्रे लागली . तीन पॅंटी आणी तेव्हढ्याच ब्रा त्याच्या हाती लागल्या. त्याने सगळे सामान ठेऊन दिले. आणी अचानक त्याच्या डोक्यात आले. कि ही सकाळी येताना हात हलवतच आली होती. म्हणजे तिच्या कडे काहीच कपडे नसणार.. अंतरवस्त्रे तर तिने आणली पण ड्रेस , साडी वैगरे काहीही तिने आणले नव्हते. आता तिला त्याची पण गरज होती म्हणून तिला काही कपडे घ्यावेत असे त्याने मनाशी नक्की केले.

" हे काय नवीन कप...?" तिने चहा नवीन कपात आणलेला बघून तो चमकला...

" नाहीतर काय...? कसले कळकटलेले कप होते...शी... मला असे अजिबात आवडत नाहीत. दिले फेकून.." ती म्हणाली. आपल्याला हे प्रकरण खुप जड जाणार आहे ह्याची त्याला जाणीव झाली. सकाळी तिने सगळे घर आवरले होते आणी आता नवीन भांडीकुंडी.. चहा प्यायल्यावर चहाचा कप धुवून ठेव असे म्हणाली नाही म्हणजे मिळवली.. चहाचा कप घेताना त्याच्या मनात विचार आला. म्हणून त्याने एक चोरटा कटाक्ष तिच्या कडे टाकला.

" पी... पी... तुला नाही कप धुवायला सांगणार... " त्याच्या मनातील अचूक ओळखत ती म्हणाली. तसा तो चमकला.

" आपल्याला बाहेर जायचे आहे.. तेव्हा चहा पिऊन झाला कि निघ.. "

" आता कुठे ? आता नको.. मी आताच बाहेरून आली दमली आहे .." ती नकार देत म्हणाली..

" काही होत नाही...असे पण चालत जायचे नाही बाईक वर जायचे आहे..." तिचे काहीही न ऐकता त्याने तिला तयार केले. शेवटी नाईलाजाने ती तयार झाली. तिला बाईक वर बसवून तो परत बाजारात निघाला..

एका चांगल्या कपड्याच्या दुकानात तिला तो घेऊन गेला.

" बोला सर काय दाखवू ? " सेल्समन अगदी तत्परतेने पुढे आला.

" मॅडम ना चांगले , शोभतील असे काही ड्रेस दाखवा.. राज म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तिच्या कडे घरात घालायला कपडे नव्हते. घरात लागणारे सामान घेताना शेवटी फारसे पैसे उरलेच नव्हते. त्यामुळे तिच्या कपड्याचे राहूनच गेले. पण तो मात्र तिला घेऊन कपड्याच्या दुकानात आला ह्याचे तिला अप्रूप वाटत होते .

सेल्समन ने कितीतरी छान छान ड्रेस कॉउंटर वर मांडून ठेवले. ती सगळे मागून पुढून निरखत होती. त्याचा रंग , डिझाईन वैगरे बघत होती. शेवटी तिने दोन ड्रेस पसंद केले. त्यात अजून एक मला आवडला म्हणून त्याने एक ड्रेस आणखीन घेतला. त्या नंतर तीन चांगल्या मॅक्सी त्याने घेतल्या. आता तिला कपड्याची चिंता नव्हती.

" ठीक आहे कि अजून काही हवय ?" त्याने विचारले..

" नको.. एव्हडे ड्रेस , मॅक्सी पुरेश्या आहेत.." ती खुश होऊन म्हणाली.

" बरं मग चल... " त्याने कपड्याचे पैसे देऊन टाकले..

" एव्हडे कपडे घेण्याची काही गरज नव्हती.." ती दुकानातून बाहेर पडल्यावर म्हणाली.

" मग उद्या काय घालणार होतीस ? सकाळी तर तु रिकाम्या हातानी आली होतीस..." त्याने उत्तर दिले. त्यावर ती काही बोलली नाही. पण त्याचे आपल्या कडे बारीक लक्ष आहे. आपल्याला काय हवे नको त्याची त्याला जाणीव आहे हे बघून तिला खूप बरं वाटले. सहज चालत चालत ते एका साडीच्या दुकाना समोर आले..

" चल काही साड्या बघू... "

" अरे नको.... आता काहीही नको..." ती त्याचा हात धरत त्याला दुकाना पासून लांब खेचत म्हणाली.

" काही नाही ग , एखादी साडी घेऊ. " असे म्हणत त्याने तिच्या हातातुन आपला हात सोडवून तिचा दंड पकडून तिला खेचतच दुकानात नेले. तो ऐकणार नाही हे लक्षात आल्यावर ती ही गुपचूप त्याच्या बरोबर चालू लागली.

" अरे... राज साहेब.... आवो नी... किटी दिवसांनी आले बाबा तुम्ही...." त्यांना बघून मगनशेठ गल्ल्यावरून उठत राज ला सामोरा गेला. मगनशेठ पक्का मारवाडी.. तोंडात साखर घेऊन जन्माला आला होता. राज ला पहिल्या पासून तो ओळखत होता. मुग्धा बरोबर राज बऱ्याच वेळा इथे आला होता. त्याचा डिव्होर्स झाला आहे हे पण मगनशेठ ला माहित होते.

" बोला काय सेवा करू आपली.." मगनशेठ ने हसतच विचारले.

" शेठ, काही साड्या घ्यायच्या होत्या. एकदम चांगल्या , छान. नवीन काही आले आहे कां ? "

" आहे ना.. ए विमल...! भाभी साहेबनी साड्या दाखव... आणी परवा आलेल्या लॉट मधून पण काही साड्या दाखव.. एकदम चौकस साड्या दाखव भाभी साहेबनी. पहिल्यांदाच आपल्या दुकानात आल्या आहेत." मगनशेठ बोलत होता. आणी सुषमाचा चेहरा लाजेने गोरामोरा होत होता.. ते लक्षात आल्यावर राज ने मगनशेठ ला थांबवले..

" मगनशेठ.... मगनशेठ..... ती माझी बायको नाही.. फक्त एक फ्रेंड आहे.... "

" ओह.. माफ करा हा मॅडम , तेचे काय हाय ना कि, जास्त करून लोक आपल्या बायडी ला घेऊन येते ना म्हणून माझ्या समजण्यात चूक झाली..हां..." मगनशेठ ने माफी मागत स्पष्टीकरण दिले. त्यावर सुषमाने मान हलवून कसेबसे त्याला रिलॅक्स केले.

त्यानंतर एकापेक्षा एक सरस साड्या विमल ने काढून त्या दोघांना दाखवल्या.. सुरवातीला हौसेने साड्या बघणारी सुषमा नंतर मात्र त्या साड्याचे रंग , पोत , किनार , डिझाईन बघून गोधळून गेली. कोणती साडी घ्यावी ह्या बद्दल तिचे एकमत होत नव्हते.. शेवटी राज च्या मदतीने तिने एक छान मोरपिशी साडी घेतली. त्याबरोबरच एक हिरवी सेमी पैठणी त्याने पसंद केली. त्या दोन साड्या त्याने पॅक करायला सांगितल्या..

" किती पैसे झाले शेठ ? "

" अरे बाबा पैसे काय कुठे पळून जाणार आहेत काय ? ह्याच्या आधी किती वेळा आपल्या दुकानात आला पण कधी मी पैश्याचे नाव काढले काय ? "

" बरोबर आहे मगनशेठ , पण किती झाले ते तरी सांगा.. "

" चार हजार दोनशे रुपये झाले... पण पैश्याची काही घाई नाही... हां... सवडीने दिलेत तरी चालेल. तुमच्या सारख्या जुन्या गिऱ्हाईकासाठी आम्ही एव्हडे नक्की करू शकतो." मगनशेठ पुन्हा पुन्हा साखर पेरत म्हणत होता.

" बरं... मग येऊ आता... "

" हा... या... आणी मॅडम काही लागले तर हक्कानी यायचे आपलेच दुकान आहे. पैश्याची बिलकुल काळजी करायची नाही.. हां... " मगनशेठ हात जोडून त्यांना निरोप देत म्हणाला.

दोघे दुकानातून बाहेर आले.. रस्त्यावर संध्याकाळ असल्यामुळे गर्दी होती. कामावरून घरी जाणारी माणसे लगबगीने घरी जातं होती. त्यामुळे त्यांना चालायला काहीशी अडचण होत होती.

" आज भलताच खुश आहेस... आज गेम पास झाली वाटतेय तुझी..." ती त्याचा हात आपल्या हातात घेऊन चालत होती. रस्त्यावर गर्दी असल्यामुळे ती जवळ जवळ त्याला चिटकूनच चालत होती . चालताना त्याच्या हाताला तिच्या उन्नत उरोजाना स्पर्श अधेमधे होत होता. पण ती काही घडलेच नाही असे दाखवत चालत होती.

" घरी चल मग सगळे सांगतो.." तो म्हणाला आणी जाता जाता त्याने पाव किलो पेढे घेतले आणी दोघे बाईकवरून परत घरी निघाले. बाईकवर पण तिच्या अंगाचा स्पर्श झाला कि त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या.

घरी आल्यावर त्याने अंघोळ केली. आणी देवाला बत्ती लावली. सुगंधित अगरबत्ती लावली. मनोभावे देवाला पाया पडून त्याने देवाला पेढ्याचा नैवेद्य दाखवला.. सर्व झाल्यावर तो शांत बसला..

" आता तरी सांग... " तिने पुन्हा विचारले..

" ह्म्म्म... तु म्हणाल्या प्रमाणे आज गेम पास झाली... पण मला विश्वास वाटत नव्हता म्हणून मी जास्त खेळलो नाही. तरी साधारण सत्तर एक हजार चे वळण निघाले.. "

" अरे वा... छानच झाले... "

" इकडे ये... " त्याने तिला इशारा केला.
" बस्स इथे.. " आपल्या बाजूला तिला बसवत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.. ती त्याच्या त्या कृतीने खूप लाजली. मोहरून गेली.

" सुषमा.., गेल्या दोन एक वर्षापासून मला एकही गेम लागली नव्हती. पण तु माझ्या आयुष्यात काय आलीस माझे दिवस पालटले.. थँक्स..सुषमा.. "

" अरे थँक्स कशाबद्दल..? तु माझ्या भावासाठी जे करतोस त्यासाठी खरंतर मीच तुझे आभार मानले पाहिजे.. "

" नाही सुषमा...! तुला कळणार नाही. कि एका गेसरला त्याची गेम पास होत नसल्याचे दुःख काय असते ते... पण आज गेम पास झाली आता लवकरच आपण तुझ्या भावाचे ऑपरेशन करून घेऊ... थँक्स... " असे म्हणून त्याने तिला आपल्या मिठीत घेतले.. त्याच्या डोळ्यातून पाणी आले होते.

" जेवायला बाहेरच जाऊ या कां ? "त्याने विचारले.

" कशाला ? पटकन करते ना मी..." ती त्याच्या बाजूने उठत म्हणाली. ती लाजेने त्याची नजर टाळण्याचा प्रयत्न करत होती. म्हणून त्याने तो विषय सोडून दिला. काही वेळातच ती नवीन मॅक्सी घालून त्याच्या समोर आली.

कशी वाटतेय...? त्याने तिला वरपासून खाल पर्यंत न्याहाळले..

एकदम छान... त्याची नजर तिच्या शरीरावरुन फिरत होती तशी ती आणखीन लाजत होती. ती लाजूनच आत किचन मध्ये पळाली.. आज आनंदाच्या भरात क्लोज ला काय खबर आली ते त्याने पाहिलेच नव्हते. त्याने मोबाईल वर पाहिले तर क्लोज ला 2 आली होती. त्याची 72 ची जोडी पास झाली होती. म्हणजे पान्या व्यतिरिक्त जोडीचे पण साडे बावीस हजार चे वळण लागले होते. तो खुश झाला. हे काही अचानक झाले नव्हते ह्याची त्याला मनोमन खात्री झाली. ती आपल्या साठी लक्की आहे हे त्याला मान्यच करावे लागले.

त्या रात्री त्याने खूप वेळ चार्ट वर नजर फिरवली. वेगवेगळ्या शक्यता , जुन्या गेम ह्या सगळ्याचा विचार करत त्याने दुसऱ्या दिवसाची गेम काढली. एक जुनी गेम होती. पण मागील काही महिने ती बंद ठेवली होती. सध्याच्या त्याच्या गेम वरून तो पुन्हा जुन्या गेम कडे वळण्याची शक्यता त्याला वाटत होती. आज लागलेल्या वळणामुळे तो मोठ्या उत्साहाने गेम काढत होता. त्यात कधी रात्रीचे दोन वाजले त्याला ही कळले नाही. सर्व काही व्यवस्थित लिहून काढत त्याने चार्ट वैगरे आवरून ठेवले. आणी झोपण्याआधी पाणी प्यावे म्हणून तो किचन मध्ये गेला. किचन मध्ये सुषमा झोपली होती. आत पंखा नसल्यामुळे तिला गरम होत असावे. तिची मॅक्सी तिच्या पोटऱ्यापर्यंत वर आली होती. त्या गोऱ्यापान केशविरहित पोटऱ्या बघून राज क्षणभर तिच्या पोटऱ्याचं बघत राहिला. त्याचा श्वास जड झाला. पण स्वतः वर ताबा मिळवीत त्याने पाणी प्यायले आणी बेड वर जाऊन पडला...


पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED