जुगारी (अंतिम भाग ) निलेश गोगरकर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुगारी (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे......


मुग्धा च्या येण्यामुळे सुषमा काहीशी बैचेन झाली होती . इथे आल्या पासून ती आता पर्यंत राज आणी ते घर आपलेच असल्यासारखे वागत होती. राज ने पण तिला पूर्ण सूट दिली होती. त्यामुळे ती इथे चांगलीच रुळली होती. त्यांच्यात असे काहीही नव्हते. म्हणून त्यांच्यात शारीरिक समंध सोडले तर ती त्याची बायको असल्याच्या थाटातच सर्व काही पाहत आणी करत होती. त्या बाबतीत तिने राज ला कधीही तक्रार करायला जागा ठेवली नाही. पण आता अचानक मुग्धा आली आणी राज ने तिला आणी पार्थ ला इथे ठेऊन घेतले त्यामुळे आता त्याला आपली गरज नाही असेच तिला वाटू लागले.

त्यामुळे तिला एकदा त्याच्याशी बोलून ह्यावर काही तोडगा काढावा लागणार होता. एखादी दुसरी रूम शोधणे हाच त्यातल्या त्यात तिला योग्य मार्ग वाटत होता. त्यामुळे जेवण झाल्यावर राज तिला अड्ड्यावर जाण्याबद्दल विचारत होता तेव्हा ती पटकन तयार झाली. मुलांचा प्रश्नच नव्हता. मुग्धा होतीच आणी पार्थ आणी समीर मध्ये चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे दोघे एकमेका बरोबर छान खेळत होते.

" आम्ही जरा जाऊन येतो... " राज ने मुग्धा ला सांगितले. त्यावर तिने मान डोलावून होकार दिला.

त्याने बाईक वर सुषमाला बसवले आणी अड्डयाच्या दिशेने बाईक वळवली. आपल्या नेहमीच्या जागी बाईक लावून तो आपल्या जागी जायला वळला.

" गेम टाकायची नाही? " तिने जरा आश्चर्याने विचारले.

" नाही आज गेम नाही टाकायची... आज फक्त बोलायला तुला इथे घेऊन आलो आहे. " राज म्हणाला.

दोघे त्यांच्या नेहमीच्या शांत जागी जाऊन बसले. कोणी काही बोलत नव्हते. सुरवात कोणी आणी कशी करावी ह्याचाच विचार दोघे करत होते.

" राज , मी एखादी रूम बघते... छोटी मोठी कामे करून आमच्या दोघांचे ठीकठाक चालून जाईल. " बराच वेळ तो काही बोलेल अशी वाट पाहून शेवटी सुषमाने सुरवात केली.

" त्याची काही गरज नाही . तुम्ही दोघे पण आमच्या सोबतच राहायचे आहे. "

" अरे पण.... मुग्धा ताई...?"

" तिची काळजी करू नको... "

" अरे पण असे कसे शक्य आहे... मला हे.... "

" सुषमा...! " त्याचा आवाज कठोर झाला. तिचे वाक्य अर्धवट तोडत तो बोलू लागला.

" हे बघ मी मुग्धाशी ह्या गोष्टीवर बोललो आहे.. तिला तुम्ही आमच्या बरोबर राहण्यात बिलकुल अडचण नाही. उलट आनंदच होईल. त्यामुळे आता तु उगाचच काही अडचणी काढत बसू नकोस.... माझ्या अत्यंत प्रतिकूल काळात तु मला साथ देऊन मला परत उभे राहण्यास मदत केलीस. मुग्धाच्या अनुपस्थितीत आपले घर सावरलेस . माझी सर्व बाजूने काळजी घेतलीस ते ही कसलीही अपेक्षा न बाळगता.. हे मी कसे विसरून जाऊ ? आज ती आली म्हणून तुला दुसरी रूम घेऊन राहायला कसे काय मी हो बोलू ? इतका काही मी कृतघ्न नाही ग...मला माहित होते तुझ्या डोक्यात असेच काहीतरी चालू असणार म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो. तुम्ही दोघे आमच्या बरोबरच राहायचे हे नक्की.... राहशील ना ?" शेवटच्या वाक्य नंतर त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. त्याच्यातील सच्चेपणा जाणवून येत होता.

" ठीक आहे... राज मी राहीन... पण मुग्धा ताईने काही भांडण वैगरे काढले तर... "

" सुषमा... आता मी काय बोलतोय ते नीट ऐक.... मुग्धाला कँसर आहे. डॉक्टरांनी फारतर सहा-आठ महिने दिलेत तिला. पार्थ इथून गेला तेव्हा लहान होता. पण आता त्याला इथली , माझी सवय व्हावी म्हणून ती परत आलीय. अश्या वेळी ती तुझ्याशी काय भांडणे काढणार? " राज शांत आवाजात म्हणाला. पण त्याचा आवाज खोल गेलेला जाणवत होता.

" ओह.. सॉरी... राज... पण त्यावर काहीच इलाज नाही काय ? "

" नाही ग... सगळे उपाय करून झालेत..आता फक्त तिचे शेवटचे दिवस कसे सुखात जातील हेच बघायचे. "

त्यावर तिचे पण डोळे भरून आले. बराच वेळ दोघे शांत बसून होते. दोघे आपापल्या परीने विचारात गढले होते.

" चल घरी जाऊ या..." बराच वेळानी तो म्हणाला.

" ह्म्म्म..., " ती पण उठली . नेहमी त्याच्या बाजूने , जवळ चालणारी सुषमा आज कटाक्षाने त्याच्या पासून अंतर ठेऊन चालत होती. ते त्याच्या ही लक्षात आले होते. हिने आपल्याला एव्हडेच ओळखले कां? त्याच्या मनात विचार आला होता. तो मनातून खिन्न झाला. खरंतर त्याला पण ती आवडत होती. तिचे त्याच्यावर सत्ता गाजवणे , हक्कानी त्याचे घर आपले असल्या सारखे वागणे , स्वतःचा नवरा असल्यासारखी त्याची काळजी घेणे. अश्या छोट्यामोठ्या गोष्टीतुन त्यांच्यात जवळीक वाढत होती पण कधीही दोघांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. राजच्या मनात कधी कधी तिला आपल्या मनातील भावना सांगाव्या असे येऊन जायचे. पण तिच्या आणी त्याच्या वयात चांगलाच दहा एक वर्षाचे अंतर होते. त्यामुळे राज कचरत होता. न जाणो तिच्या मनात आणखीन काही असेल. सगळ्या इतर मुली सारखी तिचीही काही स्वप्ने असतील. राज ना कामधंद्याला , एक जुगारी. त्याच्या बरोबर आपले अख्खे आयुष्य काढायला कोण तयार होणार? मुग्धाचा अनुभव त्याला होताच.. त्यामुळे राज च्या भावना त्याच्या मनातच राहिल्या त्या कधी त्याच्या ओठापर्यंत आल्या नाहीत.

दोघे काहीही न बोलता घरी आले. अचानक मुग्धाच्या येण्याने त्या दोघात एक अदृश्य भिंत तयार झाली होती. हे मात्र खरं..

असेच दिवस जाऊ लागले. हळूहळू मुग्धा आणी सुषमाचे छान जमू लागले. पार्थ पण सुषमा बरोबर चांगला रमला होता सोबत समीर पण होताच.. राज सगळ्यांना एकत्र जोडून होता. त्यानेच समीर आणी पार्थ ला नाना खटपटी करून चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत टाकले होते. दोघे ही हुशार होते. त्यामुळे लवकरच ते शाळेत रमले. पण आता मात्र ह्या दोघींची गडबड वाढली होती. सकाळी दोघांची शाळा असल्यामुळे त्यांना तयार करणे. त्यांच्या साठी डब्बा करणे. मग त्यांना स्कूलबस ला सोडून येणे. दुपारी त्यांना परत घेऊन येणे. मग दोघांना जेवायला देणे. मग दुपारी जरा आराम करून संध्याकाळी त्यांचा अभ्यास घेणे. अश्या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त कपडे , भांडी , स्वंयपाक ही पण कामे होतीच.. दोघी पटापट सगळे आवरत होत्या. पण जसे जसे महिने जातं गेले तशी आता मुग्धाची तब्बेत खालावत गेली. आजकल ती बऱ्याच वेळा अंथरुणातच असे. त्यामुळे साहजिक सगळी कामे सुषमावर पडली होती. ती पहाटे उठून तयारीला लागत होती. राज हे सगळे बघत होता. तिला कामात मदत व्हावी म्हणून त्याने घरात फ्रिज , वॉशिंग मशीन घेऊन टाकली. तिला आणखीन मदत व्हावी म्हणून तो सकाळी लवकर उठत होता. आणी मुलांची तयारी करायला मदत करत होता. त्यांना स्कूलबस ला सोडून यायचा. देवपूजा आता रोज राजच करत होता.

एके दिवशी मुलांना सुट्टी होती म्हणून त्यांनी फिरायला जायचा हट्ट केला. त्या दिवशी मुग्धा ची तब्बेत पण जरा बरी होती म्हणून सगळे फिरायला गार्डन मध्ये निघाले. राज मुलाबरोबर खेळत होता तर सुषमा आणी मुग्धा बाजूला बसून त्यांचा खेळ बघत होते.

" चांगलेच रमलेत ना तिघे ?"' मुग्धाने तिघांन वरची नजर न काढता मुग्धा ने विचारले.

" होय ना.... असे वाटतच नाही कि काही महिन्यापूर्वी त्यांची ओळख झाली आहे." सुषमा बोलून गेली.

" सुषमा , आता मला पार्थची काळजी नाही . तो समीर , राज आणी तुझ्यात चांगलाच रमलाय पण... "

" पण काय मुग्धाताई ?" सुषमा ने विचारले.

" सुषमा , मला खरंखरं सांगशील ? "

" काय ताई ? "

" तुला राज आवडतो ? " त्यावर सुषमा काहींही न बोलता मान खाली घालून बसून राहिली.

" म्हणजे मी चुकीचे होते तर... मला वाटत होते कि कदाचित तुम्ही दोघे एकमेकांवर....."

" नाही.. तसे नाही. खरंतर मी कधी ह्या गोष्टीचा विचार केला नाही. माझ्या अत्यंत कठीण परिस्थितीत राज ने मला सावरले. समीर चे ऑपरेशन झाले. जेव्हा काही गुंडानी माझ्यावर हात टाकला तेव्हा त्याने मला इथे आसरा दिला. त्याचे खूप उपकार आहेत माझ्यावर... "

" उपकार वैगरे सोड... समजा त्याच्याशी लग्न करायचे झाले तर करशील ? "

त्यावर ती काहीच बोलली नाही. तिचे उत्तर नाकारर्थी आहे हे जाणून मुग्धा खिन्न झाली. तिला तिच्या पश्चात राज आणी पार्थ कडे बघणारे कोणी हवे होते. तिला सुषमा एकदम चांगली आणी लायक वाटत होती. तिने आतापर्यन्त जसे घर सावरले होते ते बघता , पार्थ आणी समीर ची जमलेली गट्टी बघता सुषमा ने लग्नाला होय म्हणताच ती निश्चिन्त होणार होती. पण तसे होणे काही शक्य वाटत नव्हते.

त्यानंतर काहीवेळानी राज दमून त्यांच्या बाजूला येऊन बसला. आणी मुले सुषमाला घेऊन खेळायला गेली.

" खूप दमलो यार.... काय मस्ती करतात ही मुले... " तो म्हणाला.

" ह्म्म्म... " ती विचारात असल्यामुळे एव्हडेच म्हणू शकली.

" कसला विचार करतेस ? " तिचा चेहरा बारकाईने न्याहाळत त्याने विचारले..

" राज, माझ्या नंतर तुझे कसे होणार रे...? "

" काय ? आता मध्येच हे काय ? "

" तु एकटा असतास तर एक वेळ जास्त काही वाटले नसते. पण पार्थ पण आहे... म्हणून म्हणतेय तु लग्न करून टाक... "

" काय? त्याची काही गरज नाही. आणी सुषमा आहे ना पार्थ कडे बघायला. "

" ती काय आयुष्यभर तुमच्याकडेच बघत राहील.. तिला तिचे स्वतःचे आयुष्य नाही आहे कां ? " वैतागून मुग्धा ने विचारले.

" मला काही समजले नाही..? "

" मी आताच सुषमाला विचारले....लग्ना बद्दल. तुझ्याशी लग्न करण्यात तिला सारस्य नाही... त्यामुळे तु प्रत्येक गोष्टीत तिच्यावर अवलंबून राहू नकोस.तिला गृहीत धरू नकोस. " ती शांत आवाजात म्हणाली. तर राज चा चेहरा पडला होता. तो भरलेल्या डोळ्याने समोर मुलाबरोबर खेळणाऱ्या सुषमाकडेच पाहत होता.

असेच काही दिवस गेले. आता राज पण सुषमा पासून काहीसा लांब झाला होता. इतर वेळी सुषमा ला विचारणाऱ्या गोष्टी तो स्वतः करत होता. शक्यतो तिच्याशी बोलणे तो टाळत होता. ही गोष्ट सुषमाला लक्षात आली होती. तो असा कां वागतोय हे पण तिच्या लक्षात आले होते. पण मुग्धा तिच्या बरोबर बोलत होती. अश्यातच एक दिवस मुग्धाची तब्बेत जास्तच खालावली. तिला दोन दिवस हॉस्पिटल ला ऍडमिट करावे लागले. दोन दिवस राज हॉस्पिटल लाच होता. सुषमा मुलाकडे बघत होती. त्यांना ख्रिसमस ची सुट्टी होती. दोन दिवसा नंतर मुग्धा ला घरी आणले. त्यावेळी तिचे आई बाबा पण आले होते. तिला जरा बरे वाटले कि काही दिवसा साठी माहेरी घेऊन जावे असा त्यांचा आग्रह होता. शेवटच्या दिवसात मुली बरोबर काही काळ घालवावा असे वाटणे काही गैर नव्हते.

त्या प्रमाणे दोन चार दिवसात तिला बरे वाटल्यावर राज तिला तिच्या माहेरी सोडून आला. सुट्टी असल्यामुळे पार्थ पण जाणार होता. मुग्धा ने समीर ला पण घेऊन जावे असे निश्चित केले. त्या बद्दल तिने सुषमाला विचारले. तिने समीर चा चेहरा बघत होकार दिला. आणी मग राज त्या तिघांना मुग्धाच्या घरी सोडून आला. मुग्धा ची औषधे , मुलांचे कपडे त्यामुळे त्यांना कॅब करून जावे लागले.

राज संध्याकाळी घरी आला. सुषमा त्याची वाट पाहतच होती. आज पासून दोन तीन दिवस ते दोघेच घरात होते. तसा तिला राज वर विश्वास होता. पण सध्या त्यांच्यात असलेला ताण बघता घर एकदम शांत होते. राज आल्या पासून तिच्याशी एक शब्द ही बोलला नव्हता. तिला ही गोष्ट असह्य होत होती.

" राज... काय झाले ? "

" कुठे काय ? "

" बरेच दिवस बघते आहे कि तु माझ्याशी बोलायचे टाळतो आहेस. "

" असे काही नाही..." मुग्धा च्या बद्दल विचार करतो आहे. त्याच टेन्शन मध्ये आहे. तो कसातरी म्हणाला. पण तो धडधडीत खोटे बोलतोय हे तिला कळत होते. आपण लग्ना ला नकार दिला आहे हे समजून त्याच्या मनाला खोल लागून गेला आहे हे तिला माहित होते. ह्यातुन कसा मार्ग काढावा तिला कळत नव्हते. तो तिला आवडत नव्हता असे नाही.. त्याचे काळजी करणे , तिचा अधिकार मान्य करणे , सणासुदीला न विसरता तिला भेट आणणे सगळ्या गोष्टी तिला भुरळ पाडत होत्या. त्याच प्रमाणे तो एक चांगला माणूस होता. तिची इतकी मदत केल्यावर पण त्याने कधी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या मर्यादा ओळखून तो कायम आपल्या मर्यादेत वागत होता.
मुग्धा ताईने अचानक विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे ह्या विवंचनेत असताना ताई ने तिचा नकार गृहीत धरून टाकला होता आणी इथेच सगळं गैरसमज झाला होता. त्यानंतर राज पण तिला टाळायला लागला त्यामुळे त्याच्याशीही बोलण्याचा प्रश्न नव्हता.

ती आत गादी वर पडून ह्याच सगळ्या गोष्टीवर विचार करत होती. शेवटी तिने मनाचा निश्चय केला आणी ती उठली. तो बाहेर बेड वर शांत झोपला होता. त्याची चाहूल घेत ती बेडवर जाऊन त्याच्या बाजूला झोपली. तिने सावकाश त्याच्या अंगावर हात टाकला. तसा तो खडबडून जागा झाला.

" तु....काय झाले?" उठून बसत त्याने विचारले.

" मला खुप थंडी वाजतेय..." त्याने एकदा अविश्वासाच्या नजरेने तिच्या कडे पाहिले. आणी आपले ब्लॅंकेट तिच्या अंगावर टाकून तो तसाच झोपला.

काही वेळानी अंगावर काही नसल्याने त्याला थंडी वाजू लागली. पण तरीही तो तसाच झोपून राहिला . काहीवेळाने सुषमाने त्याच्या अंगावर ब्लॅन्केट टाकले. आणी त्याच्या जवळ सरकून त्याला चिटकून झोपली. तिच्या भरदार उरोजाचा स्पर्श त्याच्या पाठीला होत होता. तिचा एक हात त्याच्या छातीवर होता. त्याची गात्रे गरम होऊ लागली. बऱ्याच दिवसापासून तो पण स्त्री सहवासा पासून लांब होता. आज त्याचे मन बंड करून उठले. आणी त्या सगळ्यांची परिणीती म्हणून तो तिच्या दिशेने वळला... त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. जरी ती जागी असली तरी ति झोपेचे ढोंग करत आहे ते त्याला कळत होते. तो बराच वेळ तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होता.

शेवटी ती वळून त्याच्या कडे पाठ करून झोपली. पण तसे करताना पण ती त्याला चिटकूनच झोपली होती. राज ने सावकाश तिच्या अंगावरून हात फिरवला.. काही क्षण तो तिची प्रतिक्रिया बघण्यासाठी थांबला. तेव्हा तिने त्याचा हात जवळ घेऊन आपल्या छाती जवळ घेतला. आता तिचा इशारा समजून राज ही बिनधास्त तिला जवळ घेऊन झोपला. दोघे एकाच ब्लॅंकेट मध्ये एकमेकांना जवळ घेऊन झोपले होते. त्यातच त्यांची शरीरे तापली होती. त्यामुळे आता त्यांना उब जाणवत होती. राज ने सावकाश तिच्या अंगावरून हात फिरवत तिच्या शरीराची मापे काढायला सुरवात केली. त्याचा हात जसा तिच्या छातीवरून फिरला तसा एक शहारा तिच्या अंगावर आला. एक पुसटसा हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडला. त्या नंतर राज ने हळूहळू करत तिच्या सगळ्या शरीरावरुन हात फिरवत नेला. आता ती पाण्यातून काढलेल्या माश्या सारखी तळमळ होती. आणी तिच्या कामुक आवाजाने तो आणखीन जास्त पेटून उठत होता. काहीवेळातच दोघांच्या अंगावरील कपडे शरीरा वेगळे झाले. आता त्याचे नग्न शरीर तिच्या नग्न शरीराला चिटकले होते.

" आता थंडी वाजतेय कां ? " त्याने हळुवार आवाजात तिला विचारले.

" नाही ... छान वाटतेय... " ती मादक आवाजात म्हणाली.

त्यानंतर राज ने हळुवार तिला सहवासातील आनंद उलगडून दाखवायला सुरवात केली. राज ला मुग्धा , राखी ह्याचा चांगला अनुभव होता. पण तिची ही पहिलीच वेळ असल्याने सुरवातीला तिला खुप त्रास होत होता. पण सुरवातीचा त्रास सहन केल्यावर तिला ही त्यातील मज्जा जाणवू लागली. दोघे एकमेकात पूर्णपणे विरघळून गेले.झोपण्याचा प्रश्नच नव्हता. पहाटे पहाटे पर्यंत पुन्हा पुन्हा त्याच्यात सहवास झाला. शेवटी तिला आपल्या जवळच घेऊन तो शांत झोपला. आज त्याच्या मिठीत तिला खुप छान झोप लागली.

सकाळी काहीश्या उशिराने तिला जाग आली. आपल्या अंगावर एकही कपडा नाही हे लक्षात येताच ती लाजली. रात्री केलेल्या सहवासाच्या खुणा बेडशीट वर रक्ताच्या रूपाने पडल्या होत्या. शरीरात खूप काही भरून राहिलेले आज बाहेर पडले असल्यामुळे तिला खूप मोकळे मोकळे वाटत होते. तिने हळुवार त्याच्या कपाळावर किस केले. त्याबरोबर त्याने डोळे उघडले. तिला बघून त्याने पुन्हा तिला आपल्या अंगावर ओढली.

" ए... आता नको...." पाणी गेले तर सगळी कामे राहतील.. ती त्याला समजावत म्हणाली..

" थोडावेळ... ये ना माझ्या जवळ.... "

" नको...." म्हणत ती उठली..
" अजून दोन दिवस आहेत आपल्याजवळ... " हळूच हसत तिने सांगितले. आणी तो तिचे बदललेले रूप पाहतच राहिला...

ते तीन दिवस दोघात कितीतरी वेळा समंध आले. आणी त्यांच्यात नवीन नाते तयार झाले.

" तु त्या दिवशी लग्नाला कां नकार दिलास ? "

" मी नकार नाही दिला.. मी अचानक विचारलेल्या प्रश्नानी गोधळून गेली होती त्यामुळे मी काहीशी स्तब्ध झाली. पण त्याचा अर्थ मी लग्नाला तयार नाही असा काढला. त्यातच तु बोलायला तयार नाही. म्हणून मग तुझा रुसवा काढायला मला असे वागावे लागले." तिने त्याच्या मिठीत शिरून स्पष्टीकरण दिले. त्याने पण मंद स्मित हास्य करीत तिला आपल्या छातीशी लावली.

बघता बघता चार दिवस निघून गेले. मुग्धा आणी मुले परत आली. मुग्धा ला त्याने तिचा निर्णय सांगितला. ते ऐकून मुग्धा ला समाधान वाटले. असेच नंतर छान दिवस दिवस जातं होते. फक्त मुग्धाची तब्बेत खूप खराब होत चालली. तिला खूप वेदना होत होत्या. डॉक्टर तिला वेदनाशामक इंजेक्शन देत होते. पण त्याचा असर तात्पुरता व्हायचा. शेवटी तिला हॉस्पिटल मध्येच हलवण्यात आले. आठवडाभरात मुग्धा ला ही कळून चुकले कि ही तिच्या आयुष्याची अखेर आहे. त्यामुळे तिने सुषमा आणी राज ला बोलावून पार्थ कडे लक्ष दयायला सांगितले. सुषमाने त्याला आपल्या मुला सारखा जपीन असे वचन दिले. त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. तिचा सगळा जीव पार्थ मध्येच गुंतला होता. पण आता त्याची व्यवस्थित सोय लावल्यावर ती शांत झाली... आता तिला मृत्युची भीती वाटत नव्हती. पुढच्या दिवशी दुपारी तिने अखेरचा श्वास घेतला..पार्थ ने रडून खूप हंगामा केला. पार्थ ला राज आणी सुषमाने सांभाळले. मुग्धाच्या अंतिम क्रिया आणी दिवसकार्य राज ने केले.

आता पार्थ सुषमा बरोबर झोपायचा. तो अचानक रात्री झोपेतून दचकून उठायचा आणी रडायला लागायचा. तेव्हा त्याला समजावून झोपवणे हे सुषमाचं करू जाणे.

हळूहळू पार्थ पण मुग्धाच्या आठवणीतून बाहेर आला. आता पुन्हा त्यांचे नेहमीचे रुटीन चालू झाले होते.
सुषमा पहाटे लवकर उठून दोघांची तयारी करायची. राज पण आता तिला मदत करायला उठायचा. दोघांचे आटपून त्यांना शाळेत सोडून येई पर्यंत ती वॊशिंग मशीन लावून टाकायची. जेवण बनवण्याची घाई नसल्याने ते दोघे पुन्हा थोडावेळ झोप घ्यायचे... कारण मग नंतर दोघांना रात्री पर्यंत अजिबात पाठ टेकवायला मिळायची नाही.

असेच काही महिने गेले. मुग्धा ला जाऊन आता सहा महिने झाले होते. शेवटी दोघांनाही आपापसात विचार विनिमय करून कोर्टात जाऊन लग्न केले. हळूहळू त्याच्ये बस्तान बसू लागले. त्याच्या नशिबात ती लक्ष्मी बनूनच आली होती. एक नवीन जरा मोठा फ्लॅट त्यांनी घेतला. मुले चांगली शिकत होती. राज अजून पण अड्ड्यावर जातो. आता त्याचे नशीब बदलणारी त्याच्या आयुष्याची अर्धी भागीदार होती मग त्याला भीती कसली.....



© सर्वाधिकार लेखकाकडे...

==============समाप्त ===============