भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ७)

  • 4.9k
  • 2.1k

अखेर २५ मे आला. सर्वानी तयारी तर भक्कम केलेली. तरीसुद्धा शेवटच्या दिवशी काम केलेच पाहिजे , म्हणून सर्व ऑफिस मध्ये आलेले. अमोल सुप्रीचीच वाट बघत होता. त्या दोघी जश्या आल्या तसा तो लगेच त्याच्याशी बोलायला आला. " काय मग ... येणार ना उद्या... " सुप्रीलाच पहिला प्रश्न. " येते आहे.. माझ्यामूळे लोकांना misunderstanding होते. म्हणून तयार झाले. उगाच गरीब आहे म्हणून नावं ठेवतात लोकं . " अमोलला काय बोलावं कळेना, हसू लागला. " बरं ... सॉरी बाबा.. पण थँक्स... तू तयार झालीस... तुझ्याशिवाय मज्जाच आली नसती तिथे " ," मी काय जोकर आहे का ? " सुप्रीच्या त्या डायलॉग वर पुन्हा हसू