भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ७) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ७)

अखेर २५ मे आला. सर्वानी तयारी तर भक्कम केलेली. तरीसुद्धा शेवटच्या दिवशी काम केलेच पाहिजे , म्हणून सर्व ऑफिस मध्ये आलेले. अमोल सुप्रीचीच वाट बघत होता. त्या दोघी जश्या आल्या तसा तो लगेच त्याच्याशी बोलायला आला.
" काय मग ... येणार ना उद्या... " सुप्रीलाच पहिला प्रश्न.
" येते आहे.. माझ्यामूळे लोकांना misunderstanding होते. म्हणून तयार झाले. उगाच गरीब आहे म्हणून नावं ठेवतात लोकं . " अमोलला काय बोलावं कळेना, हसू लागला.
" बरं ... सॉरी बाबा.. पण थँक्स... तू तयार झालीस... तुझ्याशिवाय मज्जाच आली नसती तिथे " ,
" मी काय जोकर आहे का ? " सुप्रीच्या त्या डायलॉग वर पुन्हा हसू लागला अमोल. कुठेतरी फिरायला जातो आहे , त्याही पेक्षा सुप्री असेल इतके दिवस सोबत याचाच आनंद जास्त होता त्याला.


काही मुलं-मुली ," उद्या कुठे आणि किती वाजता भेटायचं " हे ठरवून दुपारीच निघून गेले. अमोल सुद्धा जेवून निघून गेला. सुप्री-संजना आणि काही मंडळी होती अजूनही. त्यात आज आभाळात ढगांची लगबग सुरु झाली होती. यंदा पाऊस लवकर आहे , असा सुप्रीचा अंदाज. अमोल आनंदात घरी परतला. आज घामाच्या धारा नव्हत्या चेहऱ्यावर, वेगळाच अस्मानी आनंद होता चेहऱ्यावर. सुप्रीला अजूनही जवळून अनुभवायला मिळेल. असा विचार त्याच्या मनात आला. तयारी करत होता घरी, मधेच काही आठवून हसे अमोल. अमोलची आई कधी पासून पाहत होती .
" काय गं आई... काय बघतेस... " अमोलने विचारलं.
" काय करतो आहेस नक्की.. " आईने विचारलं.
" काय म्हणजे... लगेच विसरलीस का ,.... ट्रेकिंग , पिकनिकला जातो आहे मी... काय यार आई... लक्षात राहत नाही तुझ्या... म्हातारी झालीस , वय झालं तुझं .." अमोल आईला चिडवत म्हणाला.
" मी म्हातारी झाली आणि तू तरुण झालास.. " आई हसत म्हणाली. " कधी पासून बघते आहे तुला.. मधेच काय हसतोस... एकटाच... हल्ली स्वतःच्याच विश्वात असतोस. आणि पहिल्यापेक्षा जास्त खुश, आनंदी असतोस... कोण भेटली आहे तुला.. " आईने सरळचं विचारलं.


" ohh, come on आई.. असं काही नाही... तू पण ना... " अमोलच्या चेहरावर दिसतं होतं सगळं.
" हे बघ.. एवढ्या उत्साहात तुझी तयारी सुरु आहे. तू काही पहिल्यांदा चालला नाहीस कुठे फिरायला. पण या वेळेस लक्षण वेगळी आहेत. तुझी आई आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते तुला... तू काही वेगळं म्हणत असशील, पण मला माहित आहे... तुला काय झालं आहे ते.. " आई मोठ्या खुशीने बोलत होती. अमोलने तयारी थांबवली.
" डॉक्टर साहेब ... सांगा काय झालं आहे मला... " अमोल हाताची घडी घालून उभा राहिला.
" प्रेमात पडला आहेस, प्रेमरोग म्हणतात याला... " आईने अमोलच्या केसातून हात फिरवला आणि
हसतच आत निघून गेली. काय बोलून गेली आई, खरंच का.. असं झालं आहे का... अमोल विचारात हरवून गेला.


संध्याकाळचे ५ वाजले तसे, ऑफिसमध्ये जे थांबले होते ते निघाले घरी. सुप्री, संजना सर्वात शेवटी निघाल्या. संजना scooty सुरु करत होती.
" संजना... बोलू का जरा... " सुप्री
" बोल .. " संजनाने सुरु केलेली गाडी बंद केली.
" खरचं गरज होती का.. " ,
" कसली गरज.. ? " ,
" हेच ... सर्व पुन्हा, तेच तेच... " सुप्री..
" स्पष्ट बोल सुप्रिया... " संजना हाताची घडी घालत बोलली.
" ६ महिन्यापुर्वीच आपण पाचवा आणि शेवटचा प्रयन्त केला. त्याआधी पासूनच आपल्याला यात अपयश येते आहे. आणि उद्या पुन्हा आपण निघत आहोत. खरंच गरज होती का याची...आकाशचे नसणे , हे मी कधीच मान्य केलं आहे.. तू का करत नाहीस. " सुप्री जरा रागात बोलली.
" मला माहित होतं कि त्यादिवशीही राग आलेला तुला आणि आजही रागात आहेस... आकाशचे असे जाणे , तुला धक्का बसला तसा मलाही... माझासुद्धा तो होता ना कोणीतरी.. म्हणून हे सगळं.. देवापुढे कोणाचं चालत नाही, तरी १ टक्का शक्यता असली तरी मी प्रयन्त करणार. कारण आकाशच बोलायचा ना ट्रेकिंग करताना... प्रयन्त केले तर अगदी १ टक्क्याने सुद्धा यश मिळते... ९९ टक्के अपयशापेक्षा १ टक्का यश ग्रेट असते. आठवलं ना तुला... हेचं... असचं बोलायचा तो... असा मित्र मला गमवायचा नाही आणि गमावणार सुद्धा नाही... यापुढे तुझा निर्णय... यायचं असेल तर उद्या सकाळी ठरलेल्या ठिकाणी ये... " संजनाने गाडी सुरु केली. सुप्रीचा चेहरा नाराजीने भरलेला. शांतपणे संजनाच्या मागे बसली.

पाचचं मिनिटे झाली असतील. एका वळणावर सुप्रीने संजनाला थांबायला सांगितलं. तिथे एक कॅफे होता. संजनाने गाडी थांबवली. " सॉरी सुप्री.. पण जमलं तर ये उद्या वेळेवर .. " संजना निघून गेली. वारा सुटलेला.. थंडगार.. खाली जमलेला पाला-पाचोळा उडवत होता वारा... पाऊस नव्हता तरी वर आभाळात जमलेल्या ढगांमुळे वातावरण थंड झाले होते. सुप्री कॅफेकडे निघाली. हे आकाशचे , शहरातले आवडते ठिकाण. actually, कॅफे नावालाच.... मोठी library होती ती... हवं ते पुस्तक निवडायचं... एक कॉफी घेयाची आणि जितका वेळ वाटेल तेवढा वेळ पुस्तक वाचत बसायचं. त्यात ऐसपैस जागा होती. मागे बगीच्या, त्यात झाडं सुद्धा होती. विचित्र होता काहीसा तो कॅफे, त्यामुळे जास्त कोणी नसायचं तिथे. म्हणून आकाश यायचा तिथे... कधी पुस्तक वाचायला तर कधी स्वतःच काम करायला यायचा... त्याने क्लिक केलेल्या फोटोवर काम करत बसायचा. शिवाय, तिथे एक आवडीची जागा होती आकाशची... एका झाडाखाली, एक लहानसं ,छानसं टेबल होते ते. दोन वर्षात सुप्री आकाश सोबत खूप वेळा येऊन गेली होती तिथे. त्यामुळे तीही ओळखीची झाली होती. कॅफेच्या मालकाने तर ते टेबल " Reserved table " म्हणूनचं ठेवलं होतं. आकाशने सांगून ठेवलं होतं, मी नसताना सुप्री आली तर तीला या टेबलवर बसू द्या. आणि तसेच होते, आकाश गेल्यावर सुद्धा सुप्री यायची इथे.. त्याची आठवण झाली कि...

आजतर, सोबतीला भरलेलं आभाळ सुद्धा होतं. सुप्री त्याच ठिकाणी येऊन बसली. कॉफीचा कप न सांगताच हजर झाला. तसं आकाशने सांगून ठेवलं होतं. किती वेळ बोलत बसायचो आम्ही... सुप्रीने कॉफीचा कप ओठांना लावला.


" काय गं.. आल्या आल्या कॉफी पिण्यास सुरवात का... " आकाश बोलला.
" का... ओ... मिस्टर 'A'.... चुकीच आहे का काही... " सुप्री लाडात बोलली.
" चुकीचं नाही... पण कसं आहे ना.. कॉफी कशी, आपल्याआप मिसळू द्यावी... त्याला जरा वेळ लागतो... छान सुवास येतो त्यानंतर... जराश्या गरम गरम वाफा चेहऱ्यावर घेयाच्या... मग, त्यानंतर पहिला घोट घ्यावा.. हि एक प्रकारची style आहे .. " आकाश डोळे बंद करून , स्वतः feel करत बोलत होता.
" हो का सर.... पुढच्या वेळेला अक्कल दे रे गणू मला... " सुप्रीने वर आभाळाकडे पाहत हात जोडले. दोघेही हसू लागले.

अचानक आठवण झाली त्या प्रसंगाची. कप हातातच राहिला तिच्या, प्रत्येक वेळेस काही वेगळं शोधायचा.. प्रत्येक गोष्टीत... वेगळ्याच जगात निघून गेला. एकदा रात्रीचे येऊन बसलेले दोघे... साधारण रात्रीचे ९ वाजले असतील.... पौर्णिमा होती, त्यात कॅफे मधले दिवे गेलेले. या दोघांना कुठे जायचे नव्हते, शेवटी मालकाने मेणबत्ती लावून दिली. काय रोमँटिक वातावरण होतं ते... ती रात्र संपूच नये असं वाटतं होते सुप्रीला. पण काय करणार ना... वेळ पुढे धावतचं असतो ना... घरी जावंचं लागणार ना... तशी सुप्री निघाली.. " चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले.... " मागून आकाश गाणे गात होता. " गप्प रे... घरी ओरडतील नाहीतर... तुही जा घरी... उद्या जायचे आहे ना तुला... फोटोग्राफीला.. " सुप्री निघाली. तसा त्याने सुप्रीचा हात पकडला. सुप्रीने गाणं सुरु केलं. " चांदण्यात फिरताना माझा धरलास हात... सखया रे... आवर हि सावर हि चांद रात... "


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: