गोंदण

  • 13.4k
  • 1
  • 2.8k

" कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?"कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते. " च्याआयला मी तर स्वतःच हरवलोय. केव्हा पासून स्वत:चा पत्ता शोधतोय...पण सापडत नाही आहे. दुसर्यांना काय खाक शोधणार" - मी स्वत:शीच.तरीही न रहावून मी मागे पाहीले, एक आजोबा माझा हात धरुन विचारत होते. " माझ्या कमुला शोधायच आहे हो, आम्ही प्रभादेवीला जायला निघालो होतो. हाच प्लॅटफॉर्म ....खुप पाऊस आला आणि सगळीकडे गडबड झाली. गर्दीत चुकुन तीचा हात सुटला हो, आणि... आणि सगळीकडे गडबड झाली. तीला प्रवासाच काही समजत नाही. आता कुठे सापडत नाही ती."मला त्यांची दया आली.