११ एलियन! पार्टी खूपच छान झाली. ब्रुनीशी बऱ्यापैकी ओळख झाली त्या निमित्ताने. रात्री निघायला उशीर झाला पार्टीतून. रघुवीर आणि वर्षाचा निरोप घेऊन निघालो. त्या आधी ब्रुनीशी बोलणे झाले. तिला म्युझिकची आवड फार. त्यात गिटार प्रिय तिला. माझ्या गिटारवादनावर खूश झाली ती खूपच. म्हणाली, "तुझ्या बोटांत जादू आहे. इकडे जास्त कोणी वाजवत नाहीत गिटार." वर्षा त्यात म्हणाली, "अगं ही वाॅज फेमस फाॅर हिज गिटार इन काॅलेज. आणि ते चुरा लिया है गाणं.. इट्स अ व्हेरी ओल्ड साँग.. बट ही युज्ड टू प्ले दॅट.." "ही इज टू गुड अॅट दॅट.. पण अामच्याकडे नाहीच हे वाद्य!" ब्रुनी निघता निघता म्हणाली. आमच्याकडे