"कसला क्युट दिसतो ना गं तो.. तुला सांगते स्नेहा, असं वाटतं.. सगळं सोडून त्याचं होऊन जावं.." निता पीसीवर फेसबुक चालू करून माझ्याशी बोलत होती. त्याचा प्रोफाईल फोटो पाहत.. हल्ली तिचं हे दररोजचंच झालेलं.. कशी ओळख झाली काय माहीत यांची. फेसबुकवरची मैत्री.. किती दिवस टिकेल शंकाच होती. आणि वर निता म्हणजे अगदी कहरच.. "अगं पण तु का नसत्या भानगडी मागे लावून घेतेस.. तुला एक बॉयफ्रेंड जमत नाही का गं.." मीही जरा रागातच बोलले. "अरे तू नही समझेगी मेरी जान.. कमब्खत दिल भवरें की तरह उडता है मेरा.. आ जात